बीड पत्तन येथे नारायणदास नावाचा गुजराथी ब्राम्हण होता फिरत फिरत तीर्थयात्रा करीत येणाऱ्या ब्राम्हणाने त्यास सांगितले मी एक सिद्धपुरुष योगेश्वर अक्कलकोटी पाहिले त्यावर नारायणदास म्हणाला या कलियुगात साधू संत संन्यासी पोटासाठी फिरत असतात लोकांना चमत्कार दाखविणारे हे कसले अवतारी त्यावर यात्रेकरू ब्राम्हण म्हणाला विनाकारण महापुरुषांची हेलना करु नये असे म्हणून तो निघून गेला नारायणदासाच्या गरोदर असलेल्या स्त्रीची प्रसूत होण्याची वेळ आली प्रसुतीच्या भयंकर वेदना तिला होऊ लागल्या पण ती काही केल्या प्रसूत होईना नारायणदास घाबरून गेला त्याला काही सुचेना आता या यात्रेकरू ब्राम्हाणाजवळ अक्कलकोट स्वामींची निंदा केली त्यामुळे तर असे झाले नसेल ना हे आठवून तो दीनवाणीने केलेल्या अपराधाची क्षमा मागून म्हणू लागला देवा आता या संकटापासून सोडवा मी आपणास शरण आलो आहे माझा दीनाचा अव्हेर करु नका इतक्यात करुणानिधी श्री स्वामी समर्थ यतिवेषात त्यांच्या घरी आले व म्हणाले अरे त्या यात्रेकरू ब्राम्हाणाजवळ आमची निंदा केलीस काय हे ऐकताच श्री स्वामींस साष्टांग नमस्कार करुन तो म्हणाला महाराज अपराधाची क्षमा करा अज्ञानपणे माझ्या कडून चूक झाली कृपा करा आणि प्रसुती वेदनेने या स्त्रीस ज्या मरणान्त वेदना होत आहेत त्यावर उपाय सांगा.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलाकथा भागातील नारायणदास गुजराथी ब्राम्हण तुमच्या आमच्या सारखा प्रापंचिक आहे प्रपंचात गुरफटलेल्याला जी सुख दुःखे हाल अपेष्टा भोगाव्या लागतात त्या त्यालाही भोगाव्या लागत होत्या ज्याचा मुळीच चिरकालीन भरवसा धरु नये अशा संपत्ती बायको मुले यांचा आपण वाजवीपेक्षा जास्त फाजील भरवसा धरतो अर्थात यास काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते फारच थोडे या कथा भागातील नारायणदास असाच एक उन्मादी सांसारिक आहे यात्रेकरू ब्राम्हणाने त्यास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांसारख्या सिद्धपुरुषाबद्दल सांगूनही त्यावर कोणतीही शहानिशा अथवा खातरजमा करुन न घेता तो म्हणाला या कलियुगात साधू संत संन्यासी पोटासाठी फिरत असतात लोकांना चमत्कार दाखविणारे हे कसले अवतारी यातून त्याचा अहंभाव आचार विचारातील उथळपणा व्यक्त झाला त्यावर त्या यात्रेकरू ब्राम्हणाने समजूतदारपणे नारायणदासास सांगितले विनाकारण महापुरुषाची हेलना करु नये पण त्याकडेही नारायणदासाने दुर्लक्षच केलेले दिसते त्याच्यात श्रद्धा सबुरी आणि भक्तीचाच अभाव असल्याचे दिसते पण त्याचे शासन त्यास मिळाले परमेश्वराचा चाबूक लांब असतो तो ज्याला मारतो त्याला जाणवते या चाबकांच्या फटक्यांचा आवाज अन्य लोकांस ऐकू येत नाही त्याची धनाढ्यता वागणुकीतील आढ्यता अहंभाव सत्पुरुषाची अकारण निंदा त्याला चांगलीच भोवली येथे श्रीमदभगवत गीतेतील कर्म सिद्धांतही संक्षिप्त स्वरुपात विचारात घेण्यासारखा आहे जैसी करणी वैसी भरणी हे सर्वज्ञात आहे एखाद्याबद्दल नाही चांगलं बोलता आलं तरी निदान वाईट तरी बोलू नये हे पथ्य तुम्ही आम्ही पाळण्याचा अर्थबोधही ह्या लीलाभागातील नारायणदास या पात्रावरुन होतो त्याच्या बायकोचे बाळंतपण अडले अक्कलकोट स्वामींच्या निंदेचा हा परिणाम असावा असे नंतर त्याला जाणवले मग क्षमा याचना प्रार्थना करणे आले या लीलेवरुन अकारण कुणाचीही निंदा नालस्ती करु नये कोणत्याही स्वरुपाचा अहंभाव ठेवू नये हा बोध यातून घ्यावा.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या