मुकुंद नावाचा सोलापुरात राहणारा ब्राम्हण रोज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन महाराज मला या संसारातून सोडवा अशी प्रार्थना करीत असे एक दिवस श्री स्वामी त्यास म्हणाले अरे वासनारहित होऊन सर्वसंग परीत्याग कर म्हणजे ताबडतोब सुख प्राप्ती होईल हे शब्द ऐकताच मुकुंदाची समाधी लागली लोकांची उपाधी होऊ नये म्हणून त्याने मौन धारण केले व तो सिध्देश्वराच्या देवळात जाऊन राहिला तो कोणाकडेही याचना करीत नसे सिध्देश्वर सरोवरी नित्यनेमाने जाऊन तो स्नान करीत असे तेथील आधिकार्याने एक दिवस त्यास ताकिद दिली की जर आजपासून या ठिकाणी स्नान कराल तर शिक्षेला पात्र व्हाल त्यांनी आपला सरोवरात स्नान करण्याचा नियम सोडला नाही म्हणून तेथील शिपायांनी मुकुंदबुवास सर्वांगातून कळा निघेपर्यंत मारले त्यास खोलीत कोंडून कुलूप लावून घेतले व वरिष्ठास कळविले दुसरे दिवशी आधिकारी येऊन पाहतात तर मुकुंदबुवा सरोवरात पोहत होते त्यामुळे सर्व आधिकारी बुवास शरण जाऊन त्यांची क्षमा मागून निघून गेले
अर्थ -भावार्थ-मतितार्थ
या लीलाकथेतील मुकुंदबुवा नित्यनेमाने श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेत असत श्री स्वामींच्या दर्शन सहवासाचा बुवांवर विलक्षण परिणाम झाला त्यास आत्मज्ञानाची ओढ लागली त्याची विषयासक्ती कमी कमी होत जाऊन अखेर ती नष्ट झाली बुवा अशा अवस्थेस पोहोचले की ते आता श्री स्वामी समर्थांस संसारातून सोडविण्याबाबत विनवू लागले सर्वसाक्षी श्री स्वामींना मुकुंदबुवाची तयारी पूर्ण झाल्याचे लक्षात आल्याबरोबर त्याच्यावर केवळ दृष्टिक्षेपाने अनुग्रह केला आपणासारिखे करिती तत्काळ नाही काळवेळ तयालागी या उक्तीनुसार मुकुंदबुवास अष्टमहासिध्दीचे घबाडच श्री स्वामी समर्थांकडून मिळाले परंतु ते मिळूनही मुकुंदबुवा अहंकारी झाले नाहीत हे येथे आपण सर्वांनीच लक्षात घेण्यासारखे आहे त्यांनी कडकडीत मौन बाळगले होते सरोवरात स्नान करण्याचा त्यांचा नित्यनियम सुरुच होता उपासनेत जो व्रतस्थपणा नित्य नियम असावा लागतो तसा तो त्यांच्यात होता प्रसंगी सरोवरात स्नान केल्याबद्दल त्यांना मारही खावा लागला कड्या कुलपात बंदही व्हावे लागले परंतु त्यांची मनःशांती कधी ढळली नाही श्री स्वामी समर्थांच्या वरदहस्ताने मुकुंदबुवा कड्या कुलपातूनही बाहेर पडले ही लीला आपणास मुकुंदबुवा सारखे व्रतस्थ होता येईल का हे अप्रत्यक्षपणे विचारते जर उत्तर होय असेल तर श्री स्वामी समर्थकृपा होणारच त्यांचे कृपाकवच लाभणारच पुढे हेच मुकुंदबुवा मौनीबुवा म्हणून प्रसिद्ध पावले शेवटपर्यंत ते सोलापुरीच राहात होते
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या