ते तिघेही गोसावी पूर्ववत झाल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या स्तुतीला प्रारंभ केला काय हो आम्ही उन्मत्त विंचवाला विष असते थोडे पण नांगी वर त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान होऊन कित्येक लोकांना धिक्कारले असेल कशाकरिता तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता ही देहबुद्धी राक्षसी नव्हे काय याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली त्या योगाने महतपुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरुपी पाप नाहीसे होऊन विवेकरुपी प्रकाश आमच्या ह्रदयात एकदम पडला जसा त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होताच अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो त्याचप्रमाणे आमची आज स्थिती झाली ती काय वर्णन करावी चारी वाणी कुंठीत होतील जन्माचे सार्थक झाले धन्य धन्य हे श्री गुरुराज धन्य धन्य हे देवाधिदेव आनंदरुप करुणासागर अनाथनाथा दीनोद्धारा भक्तवत्सला धन्य धन्य तुझी अगम्य लीला वेदशास्त्रादिकांना अगम्य आहे असो आता आमची पुढे काय वाट आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल अशा तर्हेचे विनवणीचे प्रश्न त्यांनी श्री स्वामी समर्थांना अनन्यभावे शरण जाऊन केले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

गिरी पुरी आणि भारती या तिन्ही गोसाव्यांचे वरील लीलेमध्ये आलेले मनोगत सद्यःस्थितीतही तुम्हा आम्हाला बरेच काही प्रबोधित करते नव्हे नव्हे ते आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे आपण कुणासही अगदी सहज हरवून विजय मिळवू शकतो असा उन्मत्तपणा त्यांच्यात भरला होता पण याच विद्येला त्यांनी वरील निवेदनात अविद्या म्हटले आहे त्यांनी श्री स्वामींसमोर अतिशय प्रांजळपणे कबुल केले काय हो आम्ही उन्मत्त विंचवाला विष असते थोडे पण नांगी वर त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान होऊन कित्येक लोकांना धिक्कारले असेल कशाकरिता तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता ही देहबुद्धी राक्षसी नव्हे काय याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो यातून त्यांना झालेली उपरती पश्चात्ताप व्यक्त होतो पश्चात्तापाने माणूस शुद्ध होतो तुमच्या आमच्या हातून कळत नकळत अशी चूक किंवा चुका झाल्यास श्री स्वामींपुढे बसून आपला माफीनामा प्रांजळ प्रामाणिकपणे सादर करण्यास कोणतीच अडचण नसावी ते दयेचा सागर आहेत याची प्रचिती त्या गोसाव्याप्रमाणे तुम्हा आम्हालाही येऊ शकते श्री स्वामींचे दर्शन यास त्यांनी पुण्याई असे म्हटले आहे पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली त्या योगाने महतपुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरुपी पाप नाहीसे होऊन विवेकरुपी प्रकाश आमच्या ह्रदयात एकदम पडला जसा त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होताच अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो त्याचप्रमाणे आमची आज स्थिती झाली लीला कथेत आलेल्या त्यांच्या या प्रांजळ प्रामाणिक मनोगतातून आपण काय घेणार एक मात्र निश्चित श्री स्वामी समर्थांची उपासना करण्याची बुद्धी होणे आणि ती करावयाची वृत्ती अधिकाधिक वाढत जाणे ही परम भाग्याचीच बाब आहे त्यांच्यावर गेलेली वाचा येण्याची कृपा झाल्यावर त्यांनी श्री स्वामी महाराजांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे ती व्यक्त करताना धन्य धन्य हे श्री गुरुराज धन्य धन्य हे देवाधिदेव आनंदरुप करुणासागर अनाथनाथा दीनोद्धारा भक्त वत्सला धन्य धन्य तुझी अगम्य लीला वेदशास्त्रादिकांना अगम्य आहे असो केवढा मोठा बदल त्यांच्यात झाला परमेश्वर त्याचे काम करतो उपासकाकडून त्याची कोणतीही अपेक्षा नसते पण एखादे कार्य  झाले त्यातून मार्ग निघाला तर उपासकाने कृतज्ञता ही शरणांगत भावनेने मानावी हाही बोध यातून घ्यायलाच हवा संपूर्ण बुद्धीपालट झालेल्या गिरी पुरी आणि भारती या तीनही गोसाव्यांनी श्री स्वामींपुढे नम्र होऊन जी विचारणा केली आहे आता आमची पुढे काय वाट आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल तीसुद्धा मननीय चिंतन करण्याजोगी आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या