ठाकूरदासबुवा सोलापूरहून गाणगापुरास निघाले होते वाटेत अक्कलकोटला ते तिसऱ्या प्रहरी पोहोचले अक्कलकोटात चोळाप्पाच्या चंद्रमौळी घरामागे चिंचेच्या वृक्षाखाली श्री स्वामी समर्थांची स्वारी बसलेली बुवांनी पाहिली श्री स्वामी समर्थांच्या अंतरसाक्षित्वाने बुवा चकित झाले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

ठाकूरदासबुवांनी श्री स्वामी समर्थांस या अगोदर पाहिले नव्हते की त्यांच्याबाबत थोडेसुध्दा ऐकले नव्हते पण गाणगापुरास जाताना वाटेत अक्कलकोटमध्ये चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या श्री स्वामी समर्थांना पाहिले तत्क्षणी बुवास श्री स्वामी समर्थांचे मनोहर तेजस्वी स्वरूप जाणवले तेव्हाच बुवांच्या मनात आले हे नव्हे मानव खास अवतारिक असतील अंतःसाक्षित्वाने श्री स्वामी समर्थांनी बुवांच्या मनातला हा विचार जाणला तेव्हा श्री स्वामींनी बुवास त्यांच्या खरमरीत भाषेत सुनावले की मनुष्य असो वा अवतारिक आल्या वाटेने पुढे जा यातून श्री स्वामींना असे सूचित करावयाचे आहे की आमच्याकडे यायचे जायचे नसेल तर आम्ही कोण आहोत याची उगाच चिकित्सा का आणि कशाला तू तुझ्या जागी आम्ही आमच्या जागी ठीक आहोत आतापर्यंत या संसारात धक्के खातच आलास ना अजूनही धक्केच खावयाचे असतील तर खुशाल आल्या वाटेने जा तुला कुणी अडवले बुवा कीर्तनकार होते त्यांनी गुरुंविषयी अनेकदा निरुपणही केले असेल परंतु गुरू संकल्पनेचा त्यांच्या स्वतःवर असा खोलवर परिणाम या अगोदर झाला नसेल ते दत्तभक्त असल्याचे या लीलेतून दिसते दत्तात्रेय म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश त्रैमूर्ती दत्तात्रेयाच्या पादुका यापलीकडे बुवांची समज गेल्याचे जाणवत नाही कारण दत्तप्रभूंची सेवा करावयाची तर नरसोबाची वाडी किंवा गाणगापूरला जायला हवे असा त्यांच्या मनावर प्रभाव असल्याचे जाणवते परंतु श्री स्वामी समर्थ हे दत्तप्रभूंचेच विशुद्ध स्वरूप आहे यांच्याकडेच आपण जावयास हवे हे या लीलाप्रसंगी तरी बुवास जाणवत नव्हते म्हणून तर बुवा तसेच पुढे गाणगापुरास निघाले मात्र बुवांनी पाहिलेली श्री स्वामींची स्वारी निश्चितच दैवी आहे असे त्यांना जाणवले.

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या