खेडमनूर म्हणून भीमानदीच्या काठावर यल्लम्मादेवीचे स्थान आहे श्री स्वामी समर्थ एकदा सेवेकर्यांसह तेथे उतरले सीतारामाचार्य व रामाचार्य हे दोघे विव्दान ब्राम्हण त्या गावात राहात असत आप्पासाहेब पाटील हे श्री स्वामीभक्त मणूर गावचे पाटील होते त्यांनी मणूर गावी आलेल्या श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजा करुन श्री स्वामींचे चरणतीर्थ कुटुंबातील सर्व मंडळीस दिले त्यांच्या या कृतीचे गावातील त्या दोन विव्दानांना मोठे वैषम्य वाटले ते रागाने म्हणाले काय हो हे यति (श्री स्वामी समर्थ) भ्रष्ट झालेले यांस जात नाही कुळ नाही गोत्र नाही पाहिजे त्या ठिकाणी अन्न घेतात आणि त्यात आमचे पाटलासारखे त्यांचे चरणतीर्थ घेतात याकरिता पाटलास जातीच्या बाहेर ठेवावे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेवू नये यावर सीतारामाचार्यांनी श्री स्वामी समर्थांची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव ठेवीत ते म्हणाले आपण वेदातील तसेच भागवत गीता यातील कठीण श्लोक आपल्या मनात अर्थासह अर्धे म्हणावे व अर्धे जर अर्थासह यतींनी (श्री स्वामींनी) म्हणून दाखविले तर त्यात आम्ही अवतारी पुरुष समजू मग त्यांचे चरणतीर्थ प्रसाद घेण्यास कोणतीही हरकत नाही ही युक्ती सर्वांस पटली त्यानुसार दुसरे दिवशी श्री स्वामींची परीक्षा पाहण्यास ही मंडळी यल्लम्माच्या देवळात आली प्रातःकाळी श्री स्वामींसाठी गुडगुडी भरुन मैंदरगीचा जमादार श्री स्वामींस विनवू लागला त्यावर श्री स्वामी कडाडले आज प्रथम तुम्ही ओढा आमची परीक्षा पाहण्याकरिता वीर (वैष्णव) समाज आला आहे त्यांच्या मनातील कपट जाणून श्री स्वामी समर्थ स्वतः ऋग्वेद मंत्र ऋचा आणि दोन तीन श्लोकार्ध सार्थ भगवदगीतेतील यथासांग योग उपनिषदार्थ तसेच यजुर्वेद सामवेद मंत्र आथर्ववेद समंत्रशास्त्र भडाभडा म्हणू लागले हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले त्या दोघा विव्दानांचा अभिमान उतरला महाराज आपण पूर्ण ईश्वर अवतार आहात आसे म्हणून सर्वांनीच त्यांचे चरणतीर्थ व प्रसाद घेतला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेत अपुऱ्या श्लोकांची श्री स्वामी समर्थांनी त्या दोन विव्दान ब्राम्हणांसह वैष्णवासमोर केलेली पूर्तता त्यांच्या मनातील ओळखलेले कपट यावरुन श्री स्वामी समर्थांचे पूर्ण ईश्वरी अवतारित्व सिध्द झाले होते त्यांनी सुरुवातीलाच श्री स्वामींबद्दल काढलेल्या उदगारावरुन श्री स्वामी समर्थ हे जात पात धर्म गोत्र स्पृश्य अस्पृश्य आदी भेदाभेद अजिबात मानत नव्हते कर्मठपणाच्या जातिव्यवस्थेचा जबरदस्त पगडा असतानाच्या काळातही श्री स्वामींचा आचार विचार आणि तत्त्वज्ञान कसे कालातीत होते कर्मकांड सोवळे ओवळे जात पात अतिशय कडकपणे पाळणार्यांना श्री स्वामी समर्थ भ्रष्ट वाटणारच खेडमनूरला नेमके हेच घडले श्री स्वामींच्या चरणी अनन्यभावे निष्ठा असलेल्या आप्पा पाटलाच्या कृतीने सीतारामाचार्य आणि रामाचार्यासारख्या तथाकथित ज्ञानी सनातनी मंडळींचा मस्तकशूळ उठणे साहजिक होते इतका की पाटलास वाळीत टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती त्यातून सीतारामाचार्यासारख्यांनी समजूतदारपणा दाखवून तोडगा काढला हा या लीलेतील सकारात्मक भाव रामाचार्यासारखे जहाल सनातनी हे आवरण अज्ञान कषाय विषय सेवन लय निद्रा विक्षेप भय भ्रम आणि रसास्वाद आत्मसंतुष्टता यांनी लिप्त असलेली अशी मंडळी तेव्हाही होती सद्यःस्थितीतही ती आहेत स्वरुप थोडे वेगळे असेल या लीलेत रामाचार्य जहाल सनातनी आवरण कषाय लय विक्षेप आणि रसास्वाद या पाच विघ्नांचे प्रतिनिधित्व करणारा आहे सीतारामाचार्यासारखी सारासार विवेकबुध्दीने वागणारी व्यक्तीही आहे आप्पा पाटील हा साधा भोळा सरळ स्वामीनिष्ठ आहे त्यांच्या चरणतीर्थला अमृत मानणारा एक श्रध्दाळू जीव आहे समाजामध्ये असे बरे वाईट लोक असतातच या पात्रांव्दारे घडलेली ही लीला निश्चितच आत्मबोध करुन देणारी आहे .

श्री स्वामी समर्थ



Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या