लालासाहेब अक्कलकोटला आल्यावर श्री स्वामी समर्थांना पलंगावर विराजमान झालेले पाहिल्यावर लालांची खात्री पटली की स्वप्नातील मूर्ती ती हीच महाराजांच्या समोर ती कपिला गायही दिसली ते सर्व दृष्य प्रत्यक्ष पाहताच लालांचे अष्टभाव जागृत झाले त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या ते श्री स्वामींस म्हणाले प्रभुराया तुमची अघटित लीला अघटित सामर्थ्य काय सांगावे धन्य धन्य आज माझी बेचाळीस कुळे उद्धरली ते हात जोडून खाली बसले इतक्यात श्री स्वामी महाराज म्हणाले कारे आमच्या गाईला मारीत होतास काय तुला मस्ती आली श्री स्वामींच्या ह्या भाषणाने त्यांना फारच पश्चात्ताप झाला मग ते सेवेकरता श्री स्वामींजवळ राहिले श्री स्वामींनी त्यांना आज्ञा केली कुत्र्यांना तुकडे घाला श्री स्वामींची ही आज्ञा शिरसावंद्य मानून लालासाहेब रोज कुत्र्यास भाकरी खाऊ घालू लागले काही दिवसांनी त्यांचे कुष्ठ निःशेष जाऊन शरीर दिव्य झाले श्री स्वामींची आज्ञा घेऊन ते हैद्राबादेस आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

सत्पुरुषाच्या सांगण्यानुसार लालासाहेब अक्कलकोटला आले या भागात लालासाहेबांना येण्यासाठी तो सत्पुरुष खरं तर निमित्तमात्र ठरला श्री स्वामींनीच ही लीला करुन त्यांना अक्कलकोटला आणले स्वप्नात गाय (धेनू) आणि भगवी वस्त्रे धारण केलेली तेजःपुंज मूर्ती लालासाहेबास दिसते यालाही एक अर्थ आहे श्री स्वामी हे धेनुप्रिय होते येथे धेनुप्रिय याचा अर्थ इंद्रियांना वळण लावणारा त्यांचे रक्षण करणारा असा घ्यावा शिवाय अक्कलकोटास जावे म्हणजे बुद्धीच्या गावी जावे असा अर्थ आहे झालेला रात्रीचा दृष्टांत रात्र म्हणजे त्यांच्या अज्ञानाची आणि निराशेची अवस्था अक्कलकोटास येऊन श्री स्वामींचे दर्शन घेताच श्री स्वामी म्हणाले कारे आमच्या गाईला मारीत होतास असे म्हणून लालासाहेबास संकेताची खूण पटविली या कथेत श्री स्वामी आमची गाय असा उल्लेख करतात म्हणजेच लालासाहेबांनी अंतःप्रेरणा दाबून टाकू नये ही अंतःप्रेरणाच आपल्याला सक्षम इंद्रिये मिळाली असल्याची जाणीव करुन देते ही सुद्धा एक ईश्वरी कृपाच असते त्याचा विसर पडू नये केवळ ईश्वराच्या दयेनेच आपण डोळ्यांनी बघण्याचे कानांनी ऐकण्याचे पायांनी चालण्याचे हातांनी काम करण्याचे जिभेने चव चाखण्याचे मधुर बोलण्याचे कार्य करतो इ.थोडक्यात म्हणजे आपले उठणे बसणे चालणे खाणे पिणे झोपणे आदि सर्व ईश्वरी कृपेने आणि ईश्वराने दिलेल्या अवयवांमुळेच होते म्हणून त्या ईश्वराचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये भलेही पूजा अर्चा वा अन्य उपासना करता आली नाही तरी या अदृश्य शक्तीबद्दल कृतज्ञ राहवे येथे लालासाहेबांस कुत्र्यास तुकडे खाऊ घाला असा आदेश श्री स्वामी देतात म्हणजे मन चित्त बुद्धी स्थिर निर्लेप अहंकार विरहित असावी सदैव सत्यम शिवम सुंदरमचे चिंतन मनन करीत राहवे प्राण्यांप्रती निर्मोही दयाभाव असावा जगा आणि जगू द्या हा मनोभाव असावा असे त्यांना येथे सूचित करावयाचे आहे लालासाहेबाने तसे केल्यामुळे त्यांचे कोड नाहीसे झाले थोडक्यात याचा मथितार्थ असा आहे की त्यांच्या अंगावरील कोड हे प्रापंचिक आसक्तीचे होते ते त्यांच्या शरीरावर पसरल्यामुळे ते वाईट दिसत होते आसक्तीचे खंडण आणि भक्तीचे मंडण करुन उपासना केली की त्यातून चित्तशुद्धी साधते ती साधना करण्यासाठीच ही लीला करुन श्री स्वामी समर्थांनी लालासाहेबांसारख्या जीवास आपल्याकडे खेचून भक्तिमार्गास लावले सद्यःस्थितीत एखाद्या व्यक्तीस या लीलाकथेतील लालासाहेबासारखे श्वेतकुष्ठ (कोड एक त्वचा रोग) झाले असेल तर त्या व्यक्तीने काय करावे श्री स्वामी समर्थांसारखे परमेश्वर अवतारी पुरुष तर प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यास नाहीत पण श्री स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणाऱ्या घटना त्यांच्या समाधी घेतल्यानंतरही अनेकांनी अनुभवल्या आहेत अनुभवित आहेत अशी असंख्य उदाहरणे आहेत डॉ.वि.म.भटासारखे अभ्यासू चिकित्सक लेखक त्यांच्या योग सिद्धी आणि साक्षात्कार या ग्रंथात पृ.क्र.३८९ वर स्वतःबाबत इ.स.१९५४ सालची घटना सविस्तर वर्णन करतात (श्री स्वामींनी एप्रिल १८७८ मध्ये समाधिस्त झाले) म्हणून श्वेतकुष्ठ पिडीत व्यक्तीने श्री स्वामी समर्थांची तर उपासना करावीच परंतु तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार करुन घ्यावेत आध्यात्म आणि विज्ञान या दोहोंचा उचित मेळ घालून या रोगावर मात करता येऊ शकेल या कथेतून बर्याच अर्थबोधाचे आकलन होते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या