बडोद्याचे भाऊसाहेब घोरपडे तीर्थयात्रा करीत करीत पुन्हा अक्कलकोटास आले त्यांनी श्री स्वामी समर्थांस अंतःकरणाने नमन करुन प्रेमाश्रंनी श्री स्वामीचरण धुतले आणि वस्त्राने पुसून हात जोडून श्री स्वामींपुढे विनम्रपणे उभे राहिले त्यावेळी दयाघन श्री स्वामींनी कुजके हरभराचे सात दाणे मोजून भाऊसाहेबांच्या पदरात टाकले जा खुशाल आपल्या गावी मोठे काम करा असा आशीर्वाद दिला व पदरात एक नारळ घातला थोडे दिवस अक्कलकोटास राहून भाऊसाहेब बडोद्यास आले पुढे त्यांचे जे सात शत्रू होते ते पटकीच्या आजाराने मरण पावले तेव्हा त्यास सात कुजक्या दाण्यांचा अनुभव आला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

मनुष्यजन्म मिळेपर्यंत जीवास असंख्य योनीतून फिरावे लागते तेव्हा प्रत्येक योनीचे संस्कार त्या त्या जीवावर होत असतात पुढील जन्मात तो / ती त्यानुसार वागत असतात क्लेशकारक संस्कार विशेषकरुन आधीच्या सात जन्मात फारच तीव्र झालेले असतात म्हणून देवदुर्लभ असा मनुष्यजन्म मिळाल्यावर ईश्वराच्या उपासनेत गढून जाणे केव्हाही इष्ट आणि हितकारक असते असे आपली पुराणे शास्त्रे आणि अध्यात्म सांगते परंतु सदगुरु दर्शन त्यांचे सततचे स्मरण सहवास हा ईश्वरी कृपेचाच एक संकेत असतो तो भाऊसाहेबांस लाभला होता श्री स्वामी समर्थ कृपेमुळेच त्याला छळणारे विकार शांत झाले श्री स्वामी कृपेने हे सर्व घडल्याचा बोध या लीलेतून होतो खुशाल गावी जाऊन राहा या श्री स्वामींच्या अभय वचनाचा अर्थच मुळी विविध कारणाने विकाराने शत्रूपीडाने उद्ध्दस्त झालेल्यास पुन्हा प्रस्थापित करणे असा आहे ह्या सर्व प्राप्तीसाठी श्री स्वामी समर्थ उपासना आनन्यभावाने करणे आवश्यक आहे याचा कधीही विसर पडता कामा नये हा इथला अर्थबोध आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या