आमचे घर निराळे आहे असे चिंतोपंत टोळास सांगून महाराज अक्कलकोटच्या गाववेशीसमोर फाटकात बसले तेथे ते तीन दिवस निराहार बसले चौथे दिवशी तेथील अहमद अलिखान नावाच्या रिसालदाराने श्री स्वामी समर्थांस थट्टेने विचारले हुक्का पीते हो त्यावर महाराज उत्तरले हँ पीते है हा कुणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांस ओढण्यास दिला महाराजांनी सुर सुर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला रिसालदारास मोठे आश्चर्य वाटले महाराज कोणी तरी मोठे अवलिया आहेत याची त्यास खात्री पटली
अर्थ -भावार्थ-मथितार्थ
चिंतोपंतास आमचे घर निराळे असल्याचे सांगून श्री स्वामी समर्थ गाववेशीतील फाटकात तीन दिवस निराहार स्थितीत बसले रिसालदार अहमदशहाला जाणवले की हा अवलिया येथे तीन दिवसापासून निव्वळ बसून आहे हा काहीही खाता पिताना दिसत नाही यास थंडी वार्याचीही फिकीर नाही त्यास या सर्व गोष्टींचे कुतूहल वाटले ब्रम्हानंदात डोलणारे श्री स्वामी महाराज हे कुणीतरी वेडे असावेत असे त्यास वाटले त्यात त्याचे ते वाटणे चुकीचे वा गैर होते असेही नाही ते जाणण्याचा तसा त्याचा वकूबही नव्हता जाणून घेण्याची त्यास अवश्यकताही वाटली नाही कोणत्या स्वरूपात परमेश्वर वा देव येतो अथवा भेटतो हे कळतसुध्दा नाही स्वभावातील आणि वृत्तीतील उथळपणामुळे अथवा टिंगल टवाळी करण्याच्या स्वभावामुळे देवाचे स्वरूप अनेक लोक ओळखू शकत नाहीत अथवा आपले देवाशी जिव्हाळ्याचे भावभक्तीचे अनुसंधान नसते असेच काहीसे फाटकाच्या रिसालदार अहमदशहाचे झाले यासाठी साधना करता करता देव देवाचे स्वरूप त्याचे संकेत खाणाखुणा ओळखण्याची पात्रता त्याची आकलनक्षमता येणे महत्त्वाचे असते ते येणे हे साधनेचे एक प्रकारे फलित असते हाही या लीला भागाचा मथितार्थ व अर्थबोध आहे रिसालदार अहमदशहाची अशीच अवस्था झाल्यामुळे चालत्या बोलत्या परब्रम्ह श्री स्वामी समर्थास तो वेडा समजून त्यांची थट्टामस्करी करण्याच्या उद्देशाने म्हणाला क्या हुक्का पीते हो पण हे प्रकरण काही वेगळेच आहे हे जेव्हा रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवल्यानंतर श्री स्वामींनी सुर सुर हुक्का ओढताच त्यातून धूर निघू लागल्यावर त्याच्या लक्षात आले आता तो भानावर आला त्याला परम आश्चर्य वाटले हे साधु बोवा अत्र तत्र गाव गन्ना भटकणारे नसून कुणीतरी अवलिया आहेत याची त्यास प्रचिती आली तर मग दिव्यत्वाची येथे प्रचिती तेथे रिसालदाराचे कर जुळती अशी त्याची स्थिती झाली
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या