नारायणदासाने श्री स्वामी समर्थास उपाय विचारल्यावर ते म्हणतात गरज असल्यास अक्कलकोटी जाऊन रुद्राभिषेक कर व एक हजार रुपये खर्च करुन ब्राम्हणभोजन घाल त्यावर नारायणदास महाराज आज अस्तमानापर्यंत जर प्रसूत झाली तर आपण सांगितल्या प्रमाणे मी करीन श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याची स्त्री सूर्यास्ताच्या आत प्रसूत होऊन त्यास पुत्र झाला मुलगा पाच महिन्यांचा झाला तरी नारायणदासास श्री स्वामी समर्थ दर्शनाची व नवस फेडण्याची आठवण होईना परिणामी एक दिवस नारायणदास बायकोस शिव्या देऊन वेडा झाला अंगावरची वस्त्रे फाडणे उकिरड्यावर लोळणे शिव्या देणे असे वेडे चाळे तो करु लागला पुढे त्यास त्याच्या आईने व बायकोने अक्कलकोटी आणले आणि त्यास श्री स्वामी समर्थांपुढे उभे केले इतक्यात त्याच्याकडे पाहत महाराज म्हणाले काय रे माजलास काय आणखीन पाहिजे असे सांगून ते उठून गेले नंतर तो त्याची आई बायको चार महिने श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहून त्यांची यथाशक्ति सेवा करु लागले चार महिन्यांनंतर नारायणदास बरा झाला त्याने रुद्राभिषेक केला ब्राम्हण भोजन घालून हजार रुपये खर्च केले नंतर श्री स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी आला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला भागात श्री स्वामी महाराजांनी नारायणदासास उपाय सांगितला त्यावर त्याने जर तरची भाषा वापरली खरे तर देवाच्या समोर अशी जर तरची भाषा वापरावयाची नसते पण तो प्रपंचात आणि षडरिपूत पूर्णतः गुरफटलेला असल्यामुळे त्यास आपण काय करतो याबाबत काही कळत नव्हते तो सदसदविवेक हरवून बसला होता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्याची पत्नी सूर्यास्ताचे आत प्रसूत झाली व तिला मुलगा झाला श्री स्वामींनी त्यांचे कार्य केले आता वेळ नारायणदासाच्या कर्तव्याची श्री स्वामींना कबुल केल्याप्रमाणे वागण्याची स्वकर्तव्य पार पाडण्याची होती पण त्याला त्याचा कृतघ्नपणा नडला ज्यांच्या कृपेने त्याची स्त्री प्रसूत झाली तिला मुलगा झाला त्या श्री स्वामी समर्थांचेच त्याला विस्मरण झाले खरेतर स्त्री प्रसूत झाल्या झाल्या त्याने विनम्रपणे म्हणावयास हवे होते श्री स्वामी महाराज केवळ तुमच्याच कृपेमुळे हे सर्व घडले पण ते राहिले बाजूलाच आणि मुलगा पाच महिन्यांचा होईपर्यंत त्यास श्री स्वामी समर्थांची साधी आठवणसुद्धा झाली नाही केलेल्या नवसाची त्याच्या पत्नीने आठवण करुन देताच तो तिला शिव्या देऊ लागला त्याच्या कृतघ्नपणाचा हा कळसच होता आपण सर्वांनीच या घटनेतून काय बोध घ्यायचा हे विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही सूज्ञान फारसे सांगावे लागत नाही कृतघ्न बेफिकिरपणे वागणाऱ्या नारायणदासावर श्री स्वामींना अखेरीस काठी उगारावीच लागली नव्हे तर त्याला मारावी लागली तो ठार वेडा झाला अंगावरचे कपडे फाडू लागला उकिरड्यावर लोळू लागला इ.वेडेचाळ करु लागला ही कसली शिक्षा यातून आम्ही हाच बोध घ्यावयास हवा की श्री स्वामी समर्थांस काठी उगारण्याचीच नव्हे तर हातात काठी घेऊ देण्याची वेळ आपल्या आचार विचार आणि साधनेतून येऊ देता कामा नये कितीही प्रतिकुलता आली तरी त्यांच्याप्रती श्रद्धा भक्ती आणि उपासना अचल निष्ठापूर्वक चालूच ठेवली पाहिजे ते तर दयासागर आहेत चार महिन्यांच्या नारायणदासाच्या सेवेने आणि नवस पूर्तीने त्यांनी त्याला ठीक ठाक केलेच ना देवाला नवसाची भूक वा इच्छा नसते पण आपण दिलेला शब्द वचन कामनापूर्ती झाल्यानंतर नको का पाळायला हे सूत्र देवा धर्माच्या बाबतीतच नव्हे तर अन्य व्यवहारात तेव्हाही व आताही लागू आहे कारण शुद्ध सात्त्विक आचार विचार आणि व्यवहार हे धर्माचे चिरंतन मूल्य आहे हा इथला बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या