एके दिवशी श्री स्वामी महाराज फिरत फिरत रामेश्वरी येऊन एका आम्रवृक्षाखाली बसले एका ब्राम्हणाने त्यांना बघून साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज आपणाजवळ भोजनाची काहिच सामुग्री दिसत नाही  तरी मी आपाणास रोज नैवेद्य आणीन असे सांगून तो घरी आला त्याने बायकोकडून उत्तम प्रकारचा नैवेद्य करविला त्याने ताट भरुन नैवेद्य श्री स्वामींपुढे ठेवला त्याचा शुद्ध भाव पाहून श्री स्वामींनी त्यातील थोडे खाल्ले असा नियम रोज सुरू होता त्यास श्री स्वामी हे अवतारी पुरुष असावेत केवळ पूर्वपूण्याईने त्यांचे दर्शन झाले असे त्यास वाटले यांना पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करावी म्हणून तो त्याच्या पत्नीसह श्री स्वामींच्या दर्शनास आला उभयतांनी श्री स्वामी महाराजांच्या चरणावर साष्टंग नमस्कार घालून पुत्र प्राप्तीविषयी प्रार्थना केली श्री स्वामी महाराज म्हणाले पुत्र होईल जाईल जा असे सांगून ते तेथून निघून गेले नंतर ते दोघे आनंदाने घरी आले मात्र त्या आम्रवृक्षाखाली श्री स्वामी महाराजांसाठी नैवेद्य ठेवण्याचा त्यांच्या नित्यक्रम सुरुच होता पुढे त्याच्या पत्नीस एक वर्षाचे आतच गर्भधारणा होऊन पुत्र झाला त्यांना फार आनंद झाला मुलगा सात वर्षांचा झाल्यावर त्यास श्री स्वामी महाराजांच्या पायावर घालून त्यांचे दर्शन करवावे असे त्या उभयतांच्या मनात येऊन श्री स्वामी महाराज केव्हा येतील अशी वाट पाहात ती दोघेही चिंतेत होती 


अर्थ / भावार्थ / मथितार्थ

श्री स्वामी समर्थ फिरत फिरत रामेश्वर तीर्थक्षेत्री आले तेथे एका आम्रवृक्षाखाली बसले होते एका ब्राम्हणाने अनेक दिवस त्यांना बघितले त्यांच्या जवळ भोजनाची काहीच सामग्री त्यास दिसली नाही त्यास श्री स्वामींच्या अवतारित्वाची आणि त्यांच्यातील ईश्वरी तत्वाची काहीच कल्पना नव्हती कल्पना असण्याचे कारणही नव्हते कारण तो प्रथमच त्यांना पाहात होता श्री स्वामी समर्थांची राहणीच मुळी शय्या भूमितलं दिशोःपि वसनं ज्ञानमृतं भोजनं अशा प्रकारची होती त्यांच्याकडे साधे भांडेकुंडे तर सोडाच पण संन्याशाचे दंड -कमंडलू आसान हेही कधीही नसायचे सद्ःस्थितीत तुम्हा आम्हास आढळणाऱ्या साधू संत संन्याशाचे तथाकथित बुवा बापू माऊली इ.बद्दल इथे विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही त्या ब्राम्हणाचा भक्तिभाव श्री स्वामी महाराजांप्रती जडला तो नित्यनेमाने त्यांच्यासाठी ताट भरुन नैवेद्य आणून ठेवीत असे त्याचा शुद्धभक्तिभाव पाहून त्या नैवेद्यातील थोडासा भाग ते खात श्री स्वामींचे दर्शन त्यास व त्याच्या पत्नीलाही पूर्वपुण्याईने घडले दररोज नैवेद्याचे ताट ठेवणारा ब्राम्हण पत्नीसह श्री स्वामींकडे पुत्रप्राप्ती व्हावी या हेतूने येत असे विश्वनियंत्या श्री स्वामींना त्या दोघांचेही प्रारब्ध माहित होते म्हणून त्यांनी त्या उभयतांस पुत्र होईल जाईल जा असा आशीर्वाद दिला खरं तर तेव्हा त्या ब्राम्हणाच्या प्रारब्धात पुत्रयोग नव्हताच श्री स्वामी महाराज ज्या आम्रवृक्षाखाली बसत त्यावर एक पिशाच्च (समंध) होते आणि त्याच्या मुक्ततेची वेळ जवळ आली होती तेव्हाच त्या ब्राम्हणाने नैवेद्यरुपी सेवा सुरू ठेवली होती पुत्रलालसेने पीडित ते दोघेही त्यांच्याकडे आले होते म्हणून त्यांनी सूचक संदेश दिला पुत्र होईल जाईल जा त्या दोघांना त्यातील पुत्र होईल हा भाग पुत्र लालसेपोटी चांगला लक्षात राहिला पण जाईल हा भाग लक्षात आला नाही तिथेच सर्व घोळ झाला कसा तो पुढील भागात वाचा

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या