अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे एकदा खूप आजारी पडले त्यांचा अंतःकाळ जवळ आला होता त्यावेळी त्यांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता परंतु श्री स्वामींचे दर्शन काही राजास होईना त्यांना भेटावयास येणाऱ्या प्रत्येकास ते सांगत की मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडवा परंतु श्री स्वामी समर्थ मालोजी राजांच्या राजवाड्यात दहा पंधरा दिवस आलेच नाहीत मात्र राजाच्या अंतःकाळी ते अकस्मात राजवाड्यात येऊन त्यांनी मालोजी राजांस दर्शन दिले श्री स्वामी समर्थांची ती मनोहर मूर्ती पाहता पाहताच राजाने प्राण सोडले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना श्रीमंत मालोजीराजे अक्कलकोट संस्थानचे राजे होते श्री स्वामींवर त्यांची नितांत श्रद्धा होती श्री स्वामींचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम होते एखादेवेळी मालोजी राजांकडून प्रजेशी संबंधित एखादी चुकीची अथवा अन्यायकारक कृती झाली तर श्री स्वामी श्रीमंत मालोजीराजांचा समाचार घेण्यास अगर कानउघाडणी करण्यासही मागे पुढे पाहत नसत असे असूनही श्रीमंत मालोजीराजाने व त्यांच्या राजघराण्यातील इतर सदस्यांनी श्री स्वामींना सदैव त्यांच्या दैवता समानच मानले श्री स्वामींचासुध्दा त्या सर्वांवर लोभ होता त्यामुळेच अधून मधून ते आठ आठ दिवस राजवाड्यात मुक्कामास राहत एक मात्र स्पष्ट दिसते की श्रीमंत मालोजी राजांचे जरी अक्कलकोट संस्थानावर राज्य होते तरी त्यांच्यावरही अधिराज्य श्री स्वामी समर्थांचे होते इंग्रज अधिकारीही श्री स्वामींचा योग्य तो मान सन्मान राखीत त्यांच्याशी आब राखून वागत श्री स्वामींची आणि मालोजीराजांची वरचेवर भेट होत असे एकदा मालोजीराजे खूप आजारी पडले त्यांना त्यांचा अंतःकाळ जवळ आल्याचे जाणवू लागले त्यांना श्री स्वामींच्या भेटीची तीव्र ओढ निर्माण झाली कदाचित मालोजीराजांचा अंत श्री स्वामींना समजला असावा मला स्वामी समर्थांचे दर्शन घडवा असा त्यांनी धोषा लावला होता त्यांना भेटावयास येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाजवळ श्री स्वामी समर्थ दर्शनाची तीव्र इच्छा ते प्रगट करीत हे सर्व काय श्री स्वामींना कळत नव्हते सर्वसाक्षी श्री स्वामींना श्रीमंत मालोजीराजांचा अंत केव्हा होणार हे पूर्ण ठाऊक होते म्हणूनच मालोजी राजांच्या अंतःक्षणी अकस्मात ते राजवाड्यात आले आणि राजांच्या अखेरच्या क्षणी त्यास दिव्य दर्शन दिले राजानेही श्री स्वामी समर्थांचे ते अतिशय मनोहरी स्वरुप पाहिल्यावरच प्राण सोडले यातून निखळ निष्ठापूर्वक भक्तीची शक्ती किती असू शकते याचा आपणा सर्वांनाच आत्मबोध या लीलेतून होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या