एक ब्राम्हण व त्याची बायको संतती नसल्या कारणाने अक्कलकोटास आले ते दोघेही उभयता श्री स्वामी समर्थांची सेवा करु लागले बाई मात्र श्री स्वामींना पुत्रसंतान व्हावे म्हणून नित्य प्रार्थना करीत असे श्री स्वामींनी दोन तीन वेळा तिला सांगितले अगं तुझ्या प्रारब्धात नाही हे ऐकून ती म्हणे प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा असे होता होता तिने श्री स्वामींचा पिच्छाच पुरवला एक दिवस श्री स्वामींनी तिला दोन खारका देत म्हटले हे घे मुलगे बाईने अतिशय आनंदाने श्री स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची खूप स्तुती केली ती तिच्या बिर्हाडी येण्यास निघाली तिचे सोवळे ओवळे विलक्षण होते आणि श्री स्वामींच्या दर्शनास अनेक जातीचे लोक येत असत आपणास या सर्वांचा विटाळ झाला आहे तर स्नान करुन जावे असे तिच्या मनात आले म्हणून ती गावाबाहेर असलेल्या तळ्यावर स्नानास गेली दिवस मावळण्याची वेळ होती स्नानापूर्वी तिने श्री स्वामींनी दिलेल्या दोन खारकांचा प्रसाद तळ्या काठावरील रेतीत पुरुन ठेवल्या आणि तळ्यात स्नान केले परंतु रेतीत पुरलेल्या दोन खारका विसरुन ती तिच्या बिर्हाडी आली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
ह्या लीलाकथा भागातील ब्राम्हण स्त्रीला पुत्रसंतान नव्हते श्री स्वामी समर्थांची सेवा करीत असतानाच पुत्र संतान व्हावे म्हणून ती श्री स्वामींची नित्य प्रार्थना करीत असे परंतु सर्वसाक्षी श्री स्वामी समर्थांनी तिची समजून काढून तिला दोन वेळा सांगितले अगं तुझ्या प्रारब्धात नाही परंतु तिची समजूत काही पटत नव्हती अनेकदा सद्यःस्थितीतसुद्धा निर्गुण स्वरुपातील श्री स्वामी समर्थांची उपासना करुनसुद्धा आपल्या प्रारब्धात नसलेले आपणास मिळत नाही अशा प्रसंगी नाऊमेद न होता उपासना चालूच ठेवावयाची असते प्रारब्धामध्ये देव गुरू सहसा ढवळा ढवळ करीत नाहीत म्हणून प्रारब्ध हे भोगूनच संपवावयाचे असते असा धर्मसंकेत आहे सगुण स्वरुपात वावरणार्या श्री स्वामी समर्थांच्या त्यावेळी काय आणि सद्यःस्थितीत निर्गुण स्वरुपात वावरणार्या या स्थितीत काय या जगात प्रत्येकाला काहीना काही दुःख असणारच प्रत्येकाचे दुःख नाहीसे करण्यासाठी देवाने सतत हस्तक्षेप केल्यास जीवनचक्रच थांबेल खूप मोठा गोंधळ निर्माण होईल तो होऊ नये म्हणूनच कुणाही देव देवतेचा कोणाच्याही प्रारब्धात सहसा हस्तक्षेप होत नाही यासाठीच तर उपासना हवी कारण उपासनेने प्रारब्ध भोगण्याचा कणखरपणा येतो वृत्तीत सहन शीलता संयम निर्माण होतो त्यामुळे प्रारब्धाची तीव्रता ताप कमी होतो फार तर प्रारब्ध पुढे ढकलले जाते परंतु ते पूर्णपणे नष्ट होत नाही हे खात्रीशीर समजावे या कथाभागातील त्या स्त्रीला श्री स्वामींनी तुझ्या प्रारब्धात नाही ते मागण्याचा हट्ट करु नकोस अशा शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिचे त्यावर म्हणणे एकच प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा तिचा हा प्रश्न अज्ञानमूलक होता त्या बाईसारखे प्रत्येकजण म्हणावयास लागला तर या जीवनसृष्टीच्या चक्रात मोठे असंतुलन निर्माण होईल संपूर्ण जीवसृष्टीत कुणाचा कुणाला ताळमेळ राहाणार नाही म्हणून अध्यात्मात अथवा उपासनेत सदैव डोळस चिंतनशील आणि वास्तववादी असावे लागते दुर्दैवाने या कथेतील स्त्री पुत्रसंतान प्राप्तीच्या मायेत गुरफटून गेल्यामुळेच प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामीही तिची समजूत काढू शकले नाहीत तिने पिच्छाच पुरविल्यामुळे श्री स्वामींनी तिला दोन खारका देऊन हे घे मुलगे असे म्हटले परंतु तिचे प्रारब्ध विधिलिखीत अटळ असल्याचा प्रत्यय येथे आलाच सोवळे पाळणार्या त्या स्त्रीला श्री स्वामींकडे येणाऱ्या अनेक लोकांचाही विटाळ वाटला तो नष्ट करण्यासाठी तिने तळ्याकाठी रेतीत त्या खारका पुरल्या नंतर तळ्यात स्नान करुन ती पुरलेल्या खारका विसरुन तिच्या बिर्याडी आली प्राक्तन प्रारब्ध संचिताने तिचा पिच्छा सोडला नव्हता प्रत्यक्ष श्री स्वामींनी तिला सांगूनही समजले नव्हते अनेकदा उपासकाच्या हट्टापाई देव देवता देतातही पण त्या देण्यात अनेकदा खोट असते उणिवा असतात हे उपासकास तेव्हा समजत नाही कारण अंतर्मनात ठाण मांडून राहिलेली मोह ममता माया पिच्छा सोडत नाही जसा या लीलाकथेतील ब्राम्हणाच्या बायकोचा पुत्र संतान हवे या मोह ममता मायेने पिच्छा सोडला नव्हता इतकेच नव्हे तर तिची ही अवस्था इतकी अनावर होती की ती श्री स्वामी महाराजास एक प्रकारच्या तोर्यातच म्हणाली प्रारब्धी नाही तर देव देवता कशाला साधक उपासक सेवेकरी यांच्या उपासनेच्या निष्ठेचे आचार विचार आणि व्यवहाराचे ज्ञान देव देवतास असतेच आपण निष्ठापूर्वक मनोभावे सेवा करावी ज्याच्या त्याच्या कर्म सिद्धांतानुसार देव देवता देतच असतात हा भरवसा विश्वास असावा हाच इथला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या