ठाण्याचा लक्ष्मण कोळी गलबताचा व्यापार करीत असे असेच एकदा समुद्रात मोठे तुफान होऊन गलबत बुडू लागले गलबतातील सर्व खलाशी घाबरले या अगोदर तो अक्कलकोटला दोन तीन वेळा येऊन गेलेला असल्यामुळे त्यास श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्याच्या गोष्टी माहित होत्या म्हणून त्याने श्री स्वामींचा धावा सुरू केला अक्कलकोटनिवासिनी आई धाव आता आमचा काही उपाय चालण्यासारखा नाही बहुतेक गलबत बुडाले इकडे त्याच वेळी अक्कलकोटात श्री स्वामी चोळाप्पाच्या घरी पलंगावर बसलेले असता एकदम खाडकन उठून उजवा हात खाली करुन वर उचलला व तोंडाने हुं हुं हुं असे बोलून पुन्हा पलंगावर बसले त्यांच्या हातातून पडणारे पाणी तेथे उपस्थित असलेल्या सेवेकर्यांनी चाखून पाहिले तर ते त्यांना खारट लागले आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले त्यांनी श्री स्वामींस विचारले महाराज तुमच्या हातात खारे पाणी कोठून आले त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले समुद्रातले जहाज उचलले ना पण श्री स्वामींच्या या उत्तराचा कोणाला काही तर्क करता येईना इकडे मात्र समुद्रात एकदम वारा पडला आणि जहाज एकदम खालून गचका मारुन वर उचलल्याचा भास खलाशांना झाला जहाजात शिरलेले थोडेफार पाणी उपसून जहाज तडीस (किनाऱ्यावर) आणण्यात आले लक्ष्मण कोळ्याने धन्यता मानून कुटुंबातील सर्व माणसांसह तो अक्कलकोटला आला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन समुद्रामध्ये घडलेला वृत्तांत तेथील सेवेकर्यांना सांगितला तेव्हा चार दिवसांपूर्वी महाराजांच्या हातातून निथळणार्या खारट पाण्याचा उलगडा त्या सर्वांनाच झाला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलाकथेत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात वास्तव्यास राहूनही दूरवरच्या बारीक सारीक गोष्टींवरही लक्ष ठेवित हे दिसून येते तसेच ते स्मरणगामी म्हणजे त्यांचे स्मरण करताच धावून येणारे असल्याचेही स्पष्ट होते लक्ष्मण कोळी या घटनेअगोदर दोन तीन वेळा अक्कलकोटला येऊन गेला होता श्री स्वामींविषयी त्याला माहिती होती त्याची नाव समुद्राच्या तुफानी वादळात सापडल्यावर त्याने श्री स्वामी समर्थांचा धावा चालविला इकडे अक्कलकोटात एखादी वस्तू पाण्यातून वर काढावी अशी कृती श्री स्वामींनी केली तिकडे वादळात सापडलेले जहाजही वर उचलले गेले अन् इकडे श्री स्वामींच्या हातातून खारट पाणी निथळत होते श्री स्वामी समर्थांमुळेच लक्ष्मण कोळ्यावरील संकट टळले हा कृतज्ञभाव त्याच्यात होता म्हणूनच तो कुटुंबातील सर्व माणसांसह अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनास आला उपासनेत कृतज्ञता ऋण व्यक्त करण्याची भावना आणि परमेश्वर चरणी शरणांगत भावनाच तारक असते श्री स्वामी तारक मंत्रात ओळ आहे तिच निःशंक आणि निर्भय बनविते निःशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या