दारिद्रयाने फार पिडलेला एक गृहस्थ अक्कलकोटास येऊन काही दिवस राहिला श्री  स्वामी समर्थांपुढे तो नित्य चार चार घटका उभा राहत असे एके दिवशी श्री स्वामी महाराज महारवाड्यात असताना हा गृहस्थ त्यांच्या पुढे उभा राहिला होता श्री स्वामींनी जवळच पडलेल्या हाडकाकडे निर्देश करुन त्यास आज्ञा केली ओ हड्डी लेके जाव हे ऐकल्यावर हाडकास कसे शिवावे म्हणून तो विचारात पडला परंतु श्री स्वामी आज्ञेचे उल्लंघन कसे करावे असाही प्रश्न पडला मग त्याने थोडी हाडे धोतरात बांधून एका बाजूस नेऊन ठेवली व पुन्हा नेहमी प्रमाणे हात जोडून श्री स्वामींपुढे उभा राहिला श्री स्वामी त्यास म्हणाले आप जाव कायकु खडे तेव्हा तो बाजूस उचलून ठेवलेल्या गाठोड्या जवळ येऊन त्यास उचलून पाहतो तो ते गाठोडे त्यास जड लागू लागले उघडून पाहतो तो हाडकाऐवजी उत्तम प्रकारचे सोने त्याच्या दृष्टीस पडले त्याला खूप आनंद झाला श्री स्वामींनी त्या गरिबावर कृपा करुन त्याचे दारिद्रय दूर केले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

दारिद्रयाने पिडलेल्या एका गरीब गृहस्थावर श्री स्वामी समर्थ कृपा झाल्यावर काय परिणाम होतो हे दर्शविणारी ही लीला आहे सकाम आणि निष्काम उपासनेच्या अंगाने या लीलेतून योग्य तो बोध मिळवता येईल सकाम उपासना ही मतलबी स्वार्थी असते यात जे साध्य करावयाचे आहे त्यासाठी देवाची प्रतिमा प्रतीक मूर्ती इ.समोर ठेवून उपासना केली जाते कामनापूर्ती झाली तर देव चांगला कृपाळू इ. परंतु जर कामनापूर्ती झाली नाही तर देव काही उपयोगाचा नाही आम्ही देवाचं इतकं करतो तरी देवानं असं आमच्या बाबतीत का करावं बरं देवाकडे न्यायच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते स्वतःचे प्रारब्ध आचार विचार कर्तृत्व आदींचा सारासार विचार न करता देवाच्या नावाने गळे काढणारे व बोटे मोडणारे अनेकजण असतात परंतु निष्काम उपासकाची मनोकामना पूर्ण झाली नाही तरीही किंवा काही विपरीत घडले तरीही देवा वरच्या विश्वासाला तो तडा जाऊ देत नाही आपणच उपासनेत कोठे तरी कमी पडलेलो असू अथवा आपल्या प्रारब्धात नसावे अशी मनाची समजूत करुन उपासना न टाकता उलट उपासनेची तीव्रता वाढवतात हीच उपासना अंतिमतः श्रेष्ठ मानली जाते याचे फळ उशिरा का होईना मिळतेच मिळते भगवान श्री स्वामी समर्थ के घर में देर है लेकिन अंधेर नही है याची प्रचिती येते श्री स्वामी कुठेही असो त्यांच्या पुढे चार चार घटका पूर्ण श्रद्धेने हात जोडून तो उभा राहत असे त्याचेच फळ म्हणून त्याची तत्कालिक गरज भागविण्यासाठी म्हणजे त्याचे दारिद्रय नाहीसे करण्याची च्याची मनोकामना श्री स्वामींनी पूर्ण केली वो हड्डी लेके आव या श्री स्वामींच्या आज्ञेने तो क्षणभर गांगरला पण श्री स्वामींवरील निष्ठेने तो सावरला म्हणूनच त्याने हाडासारखी अस्पर्श शूद्र व विपरीत वस्तूही श्री स्वामींचाच हा प्रसाद आहे म्हणून धोतरात गुंडाळून घेतली तो गोंधळला होता काय करावे हे त्यास समजेना म्हणून तो नित्याप्रमाणे हात जोडून श्री स्वामींपुढे पुन्हा उभा राहिल्यावर आप जाव कायकू खडे असा त्यांचा आदेश झाल्यावर तो तेथून निघाला त्याच्या श्री स्वामींवरील श्रद्धेला भावभक्तीला सोन्यासारखी नव्हे तर सोन्याचीच फळे आली त्याचे जन्माचे दारिद्रय गेले श्रद्धा शंभर टक्के असावी त्यात मतलबीपणाची कसर नसावी हे बोधित करणारी ही लीला आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या