त्या तीनही गोसाव्यांनी श्री स्वामी समर्थांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर जगदगुरु श्री स्वामी महाराज म्हणाले संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृच्छेनं मिळेल त्यात संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला काया वाचा मनाने पीडा देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा कर्ता करविता ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल जा आता त्यावर ते तिघे म्हणाले आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा आता हे चरण सोडावेसे वाटत नाही या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फल देत नाहीत पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत आज जशी आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडावी व अद्वैतप्रेम आमच्या ह्रदयात भरुन राहवे हेच मागणे आहे आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये अशाप्रकारे त्यांनी प्रार्थना केली श्री स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद दिला तो त्यांनी श्रद्धेने भक्षण केला श्री स्वामी समर्थ समाधिस्त होईपर्यंत ते त्यांच्या सेवेत अक्कलकोटातच राहिले नंतर ते तिघेही तीर्थयात्रेस निघून गेले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वरील लीला कथा भागातून श्री स्वामींनी त्यांना केलेले मार्गदर्शन संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृच्छेनं मिळेल त्यात संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला काया वाचा मनाने पीडा देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा कर्ता करविता ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल जा आता अतिशय मौलिक त्या तीन गोसाव्यांनाच नव्हे तर ते आपणासही सद्यःस्थितीत प्रबोधित करणारे आहे श्री स्वामी त्या तिघांनाही उपदेश करुन जा आता असे अखेरीस म्हणाले तेही अर्थपूर्ण आहे जेव्हा जेव्हा श्री स्वामी मुखातून जा असा उदगार बाहेर पडायचा तेव्हा त्याचा अर्थच मुळी आता तुम्ही निश्चिंत राहा भिऊ नका मी (श्रीस्वामी) तुमच्याबरोबर आहे असा होतो त्या तीनही गोसाव्यांना अंतिमतः हा आशीर्वाद का प्राप्त झाला सुरुवातीस ते कसे होते या बाबींचा विचार करुन तुम्ही आम्ही ही बदलावयास हवे वाल्या कोळ्याचाही वाल्मीकी ऋषी झाला हे आपणास ज्ञात आहे परंतु श्री स्वामी समर्थांनी त्या तिघांना इतका भरभक्कम दिलासा देऊनसुद्धा ते श्री स्वामींस सोडण्यास अजिबात तयार नव्हते हे त्यांच्या आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा आता हे चरण सोडावेसे वाटत नाही या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फल देत नाहीत पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत आज जशी आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडवी व अद्वैतप्रेम आमच्या ह्रदयात भरुन राहवे हेच मागणे आहे आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये या आत्मकथनातून स्पष्ट होतो ह्या लीला कथेचा हा भाग आपणास काय सांगतो श्री स्वामी समर्थांच्या चरणाविन अन्य दुजे काहीही श्रेष्ठ नाही हाच प्रमुख बोध यातून मिळतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या