वे.शा.सं.दशग्रंथी माधवाचार्यांची बायको मेली कर्जही फार झाले या चिंतेने त्यांना वेड्यासारखे झाले अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांना शरण जावे असे त्यांच्या मनात आले त्याप्रमाणे ते अक्कलकोटला आले श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन उभे राहतात तोच महाराज त्यास म्हणाले सुमूहूर्त सावधान व त्यांना श्रीफळ अर्पण केले नंतर ते प्रार्थनापूर्वक श्री स्वामीस म्हणाले महाराज वृद्धपणी विवाह कसा होईल वय तर पन्नास वर्षांवर झाले कर्ज तर पाच हजारावर आहे आल्या वाटेने चालता हो श्री स्वामी मुखातील वाक्य ऐकून त्यांनी श्री स्वामीस साष्टांग नमस्कार घातला आणि ते शिरोळगावी आले तेथे त्यांचे काही आप्त होते शिरोळ येथे त्यांच्या आप्तांच्या घरी दोन कन्यांचा विवाह होता कनिष्ठ कन्येचा वर वर्हाडी मंडळीसह आला होता ज्येष्ठ कन्येचा वर काही अडचणीमुळे आला नाही ज्येष्ठ कन्येचा विवाह झाल्याशिवाय कनिष्ठ कन्येचा विवाह करता येत नाही कनिष्ठ कन्येचा वर आलेला आहे आता काय करावे माधवाचार्य येथे आलेले आहेत तर त्यास आपली ज्येष्ठ कन्या द्यावी हा विचार यजमानांनी सर्वांस कळविला माधवाचार्यासही तो विचार मान्य झाला सुमुहूर्तावर दोन्ही लग्ने लागली माधवाचार्यां जवळ एक पै नसताना श्री स्वामी कृपेने स्वरुपवान उपवर कन्या त्यांना मिळाली नंतर नूतन भार्येसह माधवाचार्य अक्कलकोटी आले श्री स्वामी समर्थांस नमस्कार करुन उभयता उभी राहताच श्री स्वामी महाराज म्हणाले आपल्या घरी जा कर्जमुक्त होऊन पुत्रपौत्रासह सुखी व्हाल श्री स्वामींचा आशीर्वाद घेऊन ते दोघे आनंदाने आपले शिरगुर गावी आले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
भीमानदीच्या काठावर शिरगुर गावी माधवाचार्य म्हणून ५० वर्षे वयापेक्षाही अधिक वयाचे एक विद्वान गृहस्थ राहत होते या लीला कथेतील प्रपंच करणारे एक साधे सरळ गृहस्थ होते पण प्रपंच करता करता ते जेरीस आले होते पत्नी वारली होती कर्ज झाले होते सर्वच परिस्थितीला ते वैतागले होते अशावेळी त्यांना अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हेच एकमेव आधार वाटले म्हणून ते त्यांच्या दर्शनाला आले त्रिकालज्ञानी श्री स्वामी समर्थांनी क्षणात सर्व काही ओळखले त्यांनी माधवाचार्यास संन्यास घेऊन त्यांच्या भजनी लागण्यास न सांगता उलट सुमुहूर्त सावधान असा आशीर्वाद दिला सद्यःस्थितील साधू संन्यासी बापू महाराज माउली आदींनी माधवाचार्या सारख्यांशी कशी वर्तणूक केली असती श्री स्वामी कृपेने माधवाचार्याचा द्वितीय विवाह शिरोळ गावातील त्यांच्या आप्ताच्या थोरल्या मुलीशी झाला शिरोळ गावातील दोन कन्यांच्या विवाहात निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव श्री स्वामींना अगोदरच होती वास्तविक माधवाचार्य बिजवर होते जरठ होते सर्व परिस्थिती जमून आली ती श्री स्वामींनी दिलेल्या सुमुहूर्त सावधान या आशीर्वादाप्रमाणे माधवाचार्यांचे शुभमंगल झाले एक पैसाही खर्च न होता माधवाचार्यांना श्री स्वामींनी दिलेले सर्व आशीर्वाद विनासायास फलद्र्प झाले ही लीला आपणा सर्वांना अनेक दृष्टिकोनातून प्रबोधित करते माधवाचार्य वेदशास्त्रसंपन्न दशग्रंथी विद्वान होते पण त्यांच्या डोळ्यावर सांप्रदयिकतेची झापडे होती कर्मठपणा त्यांची पाठ सोडीत नव्हता ते वैष्णवांचा आदर करीत तर शैव (शिवोपासक) शाक्त (देवी उपासक) गाणपत्य (गणपती उपासक) अशा व इतर सांप्रदायिकांना भेदभावाची वागणूक देत सम सकला पाहू हेच ब्रीद असणाऱ्या आणि जाणणार्या श्री स्वामी समर्थांना हे कसे रुचावे असा भेद भाव माधवाचार्यांनीच काय इतर कुणीसुद्धा कधीही करता कामा नये माधवाचार्यांच्या विद्वत्तेचा श्री स्वामींनी आदर केला त्याला अखेरीस आपल्या घरी जा कर्जमुक्त होऊन पुत्रपौत्रासह सुखी व्हाल असा आशीर्वाद दिला महाराज भक्तवत्सल आहेत भक्ताभिमानी आहेत आपण विनम्र आणि भेदाभेद भ्रम अमंगळ समजून वर्तन करावे सर्वांप्रती सहिष्णूभाव ठेवावा हाच या लीला कथेतील मुख्य अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या