नारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते श्री स्वामी समर्थ त्यास गणपती म्हणून हाका मारीत श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती त्यांना मूळव्याधीचा आजार झाला पुष्कळ वैद्य डॉक्टर झाले पण गुण येईना एकदा नाईलाजास्तव त्यांनी डॉक्टर कडून मूळव्याधीचे मोड कापले त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला घरातल्या घरातही त्यांना फिरवेना तेव्हा त्यांनी ही सर्व हकीकत अक्कलकोटात असलेल्या मोरोपंत सेवेकर्यांस लिहून कळविली त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे असेही लिहिले त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलाकथेतील नारायण सोलापूरकर हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव आहेत व्यवसायाने ते वकील आहेत व्यवसायाचा भाग म्हणून ते युक्त्या प्रयुक्त्या करणारच पण श्री स्वामींप्रती त्यांची निष्ठा होती हे निश्चितच या लीलेतून खोलवर बोध घेण्याचा अथवा शोधण्याचा प्रयत्न केल्यास पेशाने वकील असलेल्या नारायणरावाचा युक्ती प्रयुक्तीने येणारा पैसा सदोष असणार असा अतिरिक्त सदोष पैसा अनेकदा सुख समाधान शांती नाहीशी करतो हिरावून घेतो हीच नारायणराव वकीलाची मूळव्याधी म्हणता येईल श्री स्वामी महाराज त्यास गणपती म्हणून हाक मारीत गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सर्वमान्य आहे परंतु पेशाने वकील बुद्धी करामत कसरत करुन मिळविलेला अतिरिक्त पैसा त्यामुळे त्यांचे सारेच बिघडलेले श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला गोमूत्र म्हटले आहे शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी मूत्ररुपाने बाहेर टाकली जातात तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात या प्रक्रियेला गोमूत्र म्हणावयाचे असा गूढ अर्थ येथे आहे म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल शारीरिक रोग बरा करण्यापेक्षाही वृत्ती प्रवृत्तीतल्या व्याधी बर्या करणे केव्हाही चांगले ते केले म्हणजे व्याधी जातील ते स्वामी सेवेतून स्वामी कृपेने आपोआप होत असते काया वाचा मनाची शुद्धी निर्मोही निर्लेपी मन आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर माया या षडरिपू विरहित अवस्थेनेच मूळव्याधी निखालस बरी होते मानसिक स्वास्थ्य लाभते हा या लीलेतला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या