पुण्याच्या वामन राजाराम घोलप यास कराची शहरात इंजिनियरिंग खात्यात नोकरी करीत असताना त्यांनी अनेकांना त्रास देऊन पुष्कळ पैसा मिळविला ते पुष्कळ जारकर्मही (व्याभिचारी कृत्ये) करु लागले एके दिवशी एका स्त्रीशी जारकर्मास गेले असता त्या स्त्रीच्या नवऱ्याने पाहिले घोलपावर अन्य काही खटले चालले त्यामुळे त्यास अटकेत ठेवले अशा स्थितीत वामन घोलप अस्वस्थ झाला त्यास झोप येईना तो काळजीत पडून श्री स्वामीस कळवळून आळवू लागला हे अक्कलकोट निवासिनी धाव आता मला या संकटातून सोडव मी अशी कर्मे इथून पुढे करणार नाही आता आपणच माझे आई बाप आहात माझे रक्षण करा त्याचा हा धावा ऐकून दयाघन श्री स्वामी समर्थ घोलपासमोर प्रगट होऊन त्याला पोटाशी धरुन म्हणाले भिऊ नकोस संकट दूर होईल श्री स्वामींच्या या अभयवचनामुळे पुढे घोलप निर्दोष सुटले घोलपास आनंद झाला मग ताबडतोब नोकरीचा राजीनामा देऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आले तेव्हा स्वामी महाराज समाधिस्थ झाल्याचे कळाले असे असूनसुध्दा मला दर्शन कसे झाले याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे नंतर श्री स्वामी समर्थांस नैवेद्य आणि ब्राम्हणभोजन घालून घोलप पुण्यास जाऊन राहिले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

त्या काळच्या वामन घोलपांसारखी वृत्ती आणि प्रवृत्ती असलेले लोक सद्यःस्थितीतही पाहावयास मिळतात घोलपांप्रमाणे त्यांनाही उशिरा अगर लवकर केलेल्या दुष्कर्माचे प्रायश्चित भोगावेच लागते घोलपासारखे उन्मादी वृत्तीने वागत असता त्याचे परिणाम जाणवत नाहीत पण केव्हा ना केव्हा तरी परिणाम हे भोगावेच लागतात हा या लीलेतला प्रमुख बोध आहे परंतु परमेश्वरी अधिष्ठान असेल मुळात देवाधर्मावर कुलाचार कुळधर्मावर श्री स्वामी समर्थांवर श्रध्दा असेल तर केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप होऊ शकतो ईश्वरीकृपेने त्यातून मार्गही निघू शकतो अनेकदा देवाचे येणे साहाय्य करणारे हात अदृष्य असतात जसे या लीलेत आहेत तसे श्री स्वामी समर्थांनी समाधिस्थ झाल्यानंतरही घोलपास अभय देऊन वाचवले मैं गया नही जिंदा है या त्यांच्या वचनाची प्रचिती आणून दिली आजही निर्गण निराकार स्वरुपात श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांसाठी कार्यरत आहेत .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या