सुमारे दीडशे सेवेकर्यांसह श्री स्वामी समर्थ साधन दुधनीस गेले तेथे टेकडीवर एक फकीर होता तेथेच त्यांनी सेवेकर्यांसह मुक्काम केला त्यादिवशी चोळाप्पाने त्याचा मुलगा कृष्णाप्पाजवळ श्री स्वामींसाठी फराळाचे ताट भरुन पाठविले श्री स्वामींनी त्या फकिरास बोलाविले आणि त्याच्या हातून सात घास खाल्ले त्या दिवशी सायंकाळपर्यंत श्री स्वामी तेथेच होते त्यांच्या बरोबरीचे सेवेकरी भुकेने कासावीस झाले ते श्री स्वामींस प्रार्थना करुन विनवू लागले महाराज भूक लागली काय करावे त्यावर ते म्हणाले उपाशी का मरताय चुरमा लाडू यथेच्छ खा तेवढ्यात हैद्राबादचे जहागीरदार कुक्कुभाई त्यांच्या परिवारासह पुत्राचे जावळ काढण्याकरिता आले कुक्कुभाई श्री स्वामींस साष्टांग नमस्कार करुन उभे राहिले असता श्री स्वामी त्यास म्हणाले आमची पोरे उपाशी आहेत हे ऐकताच त्यांनी सर्व सेवेकर्यांस व यात्रेकरुस लाडवाचा फराळ यथेच्छ खाऊ घातला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी दीडशे सेवेकर्यांसह साधन दुधनीस गेले ते स्वच्छंदपणे फिरत ते कोठे जातील थांबतील राहतील याचाही काही नेम नसायचा ऊन वारा थंडी पाऊस प्रसंगी वादळ कशाची म्हणून ते पर्वा करीत नसत ते काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून प्रसंगी निवडुंगाच्या फडातून झप झप चालत त्यांच्या बरोबर मागून धावणार्या सेवेकर्यात काही भक्तीने काही सक्तीने काही चमत्काराच्या आशेने काही स्वार्थासाठी मनोकामना पूर्ण करुन घेण्यासाठी काही भोजनाच्या आशेने भोजनभाऊ असले सेवेकरी असत या लीलाकथेत ते साधन दुधनी या गावाकडेच आले त्यामागेही निश्चित असा अर्थ आहे त्यांनी चोळाप्पाकडून आलेल्या नैवेद्याच्या ताटातील फक्त सात घास तेही एका फकिराच्या हातून खाल्ले यातही मथितार्थ असा दिसतो की त्या काळात जाती पातीचे प्राबल्य असूनही ते जाती पाती मानत नव्हते म्हणून तर फकिराचे हातून त्यांनी अन्नसेवन केले त्यांची भूत वर्तमान आणि भविष्यावरही हुकूमत होती म्हणूनच भूकेने व्याकूळ झालेल्या सेवेकर्यांस ते अगदी सहज म्हणतात उपाशी का मरता चुरमा लाडू यथेच्छ खा त्यांच्या मुखातील वाक्य हे ब्रह्यवाक्य असायचे त्याप्रमाणे थोड्याच वेळात मुलाचे जावळ काढण्याच्या निमित्ताने आलेल्या हैद्राबादचा जहागीरदार कुक्कुभाईने सर्वांनाच यथेच्छ लाडू खाऊ घातले श्री स्वामींची ही लीला उपासना मार्गावरुन चालणाऱ्यांना काही संकेत देते उपासना करताना देहदंड सोसावा लागतो धीर संयम सहनशिलता ठेवावी लागते अशा प्रकारची कष्ट साधना जो जी करेल त्यास ब्रह्यसुखाचे भोजन (पोटभर चुरमा लाडू) मिळणारच हा या कथेचा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या