श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून संस्थान सावंतवाडीचे भोसले त्यांच्या पत्नीसह श्री स्वामी समर्थ दर्शनास अक्कलकोटला आले त्यांच्या पत्नीच्या पायास रोग होऊन आठ दहा भोके पडली होती सर्व उपाय थकले होते शेवटचा उपाय म्हणून ते उभयता अक्कलकोटास आले चौकशीअंती असे कळले की श्री स्वामी महाराज वाकदरीच्या डोंगरात होते त्या ठिकाणी घोडा मेणा वगैरे जाण्यासारखे नव्हते तरीही ते उभयता भरदुपारी बारा वाजता भोजन वगैरे न करता पायीच चालत श्री स्वामींच्या जवळ येऊन हात जोडून उभे राहिले तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले तुला दर्शन देण्याकरीता इतके लांब आलो भोसले यांनी धोतरजोडा गाद्यागिद्या शालजोडी कौपिन आदी श्री स्वामी समर्थांस अर्पण केले ते पाहून श्री समर्थ म्हणाले आम्हास रंगीत धोतरजोडा कशास आणला तुझी गादी तुला आमचे कातडे आम्हाला श्री स्वामी महाराजांचे दिव्य तेज पाहून भोसले दिपून गेले नंतर भोसल्यांनी पत्नीच्या पायाबद्दल श्री स्वामींस प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले इकडे ये तुझ्यास पायास किती भोके पडली आहेत ते पाहू वाईट कर्माचे हे फळ आहे वगैरे शिव्या देऊन पायास औषधी उपाय करुन दमलास आता हे औषध घे असे म्हणून समोरच्या कुंपणातील एका कुंदाच्या झाडास हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून लाव अशी आज्ञा झाली जवळच्याच आंब्याच्या भरलेल्या पाटीतील पाच आंबे एक नारळ पाच चिंचोके पाच खारका असा प्रसाद देऊन ते तेथून चालते झाले व एका निवडुंगाच्या कुंपणात जाऊन बसले भोसले व सर्व सेवेकरी मागून तेथे गेले भोसले चवरी वारीत उभे राहिले त्यास अरे उपाशी का मरतोस जा असे श्री स्वामींनी म्हणताच सेवेकर्यानी भोसलेस सांगितले की तुम्हास आज्ञा झाली आता तुम्ही भोजन करावे सायंकाळी राजवाड्यात येऊन त्यांनी भोजन वगैरे केले नंतर चार आठ दिवसांत श्री स्वामी समर्थांचा निरोप घेऊन भोसले सावंतवाडीस आले 


अर्थ / भावार्थ/ मथितार्थ

सावंतवाडी संस्थानच्या भोसल्यांच्या राणीसाहेबास असाध्य व्याधी झाली होती त्यांच्या पायास रोग होऊन आठ दहा भोके पडली होती सर्व उपाय निष्फळ ठरल्यावर अखेरचा उपाय म्हणून तेउभयता श्री स्वामी समर्थांकडे अक्कलकोटला आले होते त्या उभयतांची श्रध्दा भक्ती पारखण्यासाठी श्री स्वामी समर्थ दुर्गम अशा वाघदरीच्या डोंगरात जाऊन बसले परंतु पायाच्या व्याधीस न जुमानता ते दोघेही काहीही न खातापिता स्वतःचे संस्थानिकपण श्रीमंत थाटमाट विसरून भर दुपारी पायीच अडीअडचणी यांची तमा न बाळगता श्री स्वामींच्या दर्शनाच्या ओढीने वाघदरीचा डोंगर चढून गेले त्यांची तीव्र भक्ती आंतरिक ओढ संकटे याची येथे नोंद घेण्यासारखी आहे तुला दर्शन देण्यासाठी इतक्या लांब आम्ही आलो याचा  अर्थ श्री स्वामींना संस्थानिक भोसल्यांची कसोटी पाहावयाची होती व निवांत भेट व्हावी हाही हेतू होताच परमेश्वर भेटीची वाटचाल खडतर आणि लांब पल्लयाची असते असाही मथितार्थ यातून निघातो रंगीत धोतर जोडा गाद्यागिरर्घा नाकारुन श्री स्वामींनी स्वतःची निरिच्छा व निःस्पृहपणाच दाखवून दिला वास्तविक धोतरजोडी गाद्यागिरद्या ही सांसारिक प्रापंचिक खूण आहे भोसले यांना ते सर्व परत करुन ते तसे असल्याचेच श्री स्वामींनी यातून सूचित केले भोसल्यांच्या पत्नीच्या पायास भोके पडली आहेत हे इकडे ये तुझ्या पायास किती भोके पडली आहेत ते पाहू या व्याधीचे कारण त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मात असल्याचे सांगून त्यावर श्री स्वामींनी उपायही सांगितला असे सांगून स्वतःचे सर्वसाक्षित्व दाखवून दिले व त्यास पाच आंबे एक नारळ पाच चिंचोके पाच खारका असा वैशिष्ट्यपूर्ण कृपाप्रसाद दिला यातील पाच आंबे म्हणजे (हात पाय जीभ गुद आणि लिंग) ही पाच कर्मेंद्रिय पाच चिंचोके म्हणजे (शब्द स्पर्श रुप रस आणि गंध)हे पाच विषय आणि एक नारळ म्हणजे लीन मस्तक म्हणजेच शरणांगत होऊन गुरुसेवा करु लागलास तर यथावकाश सर्व ठीकठाक होईल हे त्यांना येथे सूचित करावयाचे आहे यावरुन श्री स्वामी समर्थांचे सहज बोलणे तो उपदेश सहज चालणे तो आदेश सहज खेळणे तो निर्देश हा बोध येथे होतो तो आपण सर्वांनीच नीट समजून घेतला पाहिजे 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या