एकदा नरसप्पा सुतार आपल्या शेतात जात असता श्री स्वामी एका दुकानात बसले होते नरसाप्पाने श्री स्वामींस प्रार्थना केली की आमच्या शेतात उत्तम हुरडा झाला आहे करिता खाण्यास जलावे त्यावर श्री स्वामी म्हणाले हत मादरचोदा कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे त्यावर नरसप्पा हात जोडून म्हणाला महाराज चुकलो शेत माझे नाही आपल्या शेतात हुरडा आहे तो खाण्यास चलावे.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वर वर पाहता नरसप्पा सुतार आणि श्री स्वामी समर्थ यांच्या संवादातली खोच त्यातला बोधार्थ कुणाच्याही लक्षात येत नाही पण अर्थपूर्ण बोलून तशी कृती करणे हे तर श्री स्वामी समर्थांचे खास वैशिष्ट्य अनेकदा कळत नकळत आपल्याकडूनही नरसप्पा सुतारासारखा मी चा अतिरेक होतो या मी च्या बाधेतूनच माझे घरदार माझी बायको मुले माझे हे ऐश्वर्य हे मी केले ते मी केले माझ्यामुळेच हे सर्व झाले हा मी पणाच अनेक गोष्टी बिघडवतो अनेक कामेही नासवतो नरसाप्पाच्या तोंडून निघालेल्या आमच्या या शब्दाने सारेच बिघडवले त्या एका शब्दात आमचे म्हणजे माझे शेत मी पिकवले असा मी पणा डोकावतो बिचाऱ्या नरसाप्पालाच काय आपल्यासारख्या कुणासही इतके ध्यानात कसे यावे पण श्री स्वामी समर्थांना आपल्या भक्तांच्या ते ध्यानात आणून द्यायचे होते त्याची जाणीव करुन द्यायची होती म्हणूनच ते म्हणाले हत मादरचोदा कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे याचा सरळ अर्थ असा अरे नरसप्पा तू येथे जन्मलास एक दिवस हे सर्व शेत येथेच ठेवून तू मृत्यूलोकी जाणार आहेस शेत कुणाचे कुणी दिले हुरडा पेरणारा आणि शेतात हुरडा निर्माण करणारा तू कोण कुठल्याही व्यक्तीचे कोणत्याही वस्तुवरील स्वामीत्व मालकी हक्क हा चिरकालीन नसतो पण हे ऐन उमेदीत अथवा उन्मादी अवस्थेत कळत नसते जेव्हा कळते तेव्हा नेत्र पैलतीरी लागलेले असतात आयुष्याचा सूर्य मावळतीकडे निघालेला असतो नंतर ती चूक नरसाप्पाच्या लक्षात आल्यावर तो म्हणाला चूक झाली महाराज शेत माझे नाही आपले आहे गोष्ट साधी आहे परंतु भक्ती मार्गात आणि देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी सर्व प्रकारच्या अहंकाराचे विसर्जन करावे लागते हाच या लीलाकथा भागाचा बोध आहे अभिमान दंभादिकं त्याज्यम्.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या