पुढे अक्कलकोटातच सबनीस वकिलीचा धंदा करु लागले तेव्हा पुन्हा पिशाच्च्याचा उपद्रव होऊ लागल्यामुळे त्यांनी महाराजांस विचारले महाराज पुन्हा पिशाच्च उपद्रव करते तेव्हा महाराज म्हणाले मध्यस्थपणा कशाला करता हे ऐकून त्यांनी वकिली सोडली वकिलीचा जमा झालेला सर्व पैसा श्री स्वामी सेवेत खर्च केला एक दिवस सबनीसांच्या आईने श्री स्वामींस प्रार्थना केली सरस्वतीला (सबनीसांची पत्नी) पुत्र नसल्या कारणाने जहागिरी फुकट जात आहे तेव्हा महाराज म्हणाले जा होईल मुलगा असे म्हणून सरस्वतीच्या पदरात नारळ टाकला काही दिवसांनी बाईस मुलगा झाला सबनीस नेहमी अक्कलकोटला येत असत त्यांनी अक्कलकोटला घर घेतले त्यात एक वर्षाची शिधासामुग्री भरुन श्री स्वामींसाठी ती एका ब्राम्हणाला देत श्री स्वामी समर्थांचे निरंतर भजन पूजन करीत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

सबनीसांची पिशाच्च बाधा गेल्यानंतर ते पुन्हा वकिली करु लागताच त्यांना पिशाच्चबाधेचा पुन्हा त्रास होऊ लागला का याची कारणमीमांसा कशी करता येईल सबनीसांनी पिशाच्च बाधेच्या पुन्हा होणाऱ्या त्रासाबाबत सांगताच श्री स्वामींनी त्यांना विचारलेला प्रश्न मध्यस्थपणा कशाला करता हा प्रश्न त्यांना विचार करावयास लावणारा आहे अंतर्ज्ञानी श्री स्वामींना कळले होते की सबनीस मध्यस्थपणा (वकिली) करुन पैसे कमवत आहेत काही सन्माननीय अपवाद वगळता वकिली व्यवसायाबद्दल अधिक काय लिहावे प्रत्येक व्यवसायाची काही नीतिमूल्ये असतात आचार विचाराची एक चौकट असते या सर्व बाबींचे उल्लंघन झाल्यास त्यातून मिळणारे शिव्याशाप मनःशांती ढळविणारे असतात ज्याअर्थी श्री स्वामी महाराजांनी त्यास मध्यस्थपणा कशाला करता असा रोकडा सवाल केला त्या अर्थी सबनीसांकडून कळत नकळत व्यवसायिक नीतिमूल्ये पाळली गेली नसतील आचार विचाराची चौकट तोडली गेली असेल म्हणून पुन्हा त्यांच्यात पिशाच्च्याचा उपद्रव सुरू झाला असेल पण सबनीसास शहाणपण लवकर आले त्यांनी मध्यस्थपणा सोडला वकिलीतून जमा झालेला सर्व पैसा श्री स्वामी सेवेत खर्च केला पुन्हा सबनीस ठीकठाक झाले त्यांच्या आईने मुलासाठी प्रार्थना करताच श्री स्वामींनी सबनीसांच्या पत्नीच्या पदरात नारळ टाकला जा होईल मुलगा असा आशीर्वाद दिला या लीला कथेवरुन सद्यःस्थितीत आपण काय शिकू शकतो श्री स्वामींची मनोभावे उपासना व्यावसायिक अगर व्यवहारातील आचार विचार पालन त्याच्याशी संबंधित नीतिमूल्यांचे सदैव स्मरण आणि त्यास अनुसरुन चोख आचरण.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या