भाऊसाहेब घोरपडे मोठे जहागीरदार होते त्यांना एक कन्या होती पण पुत्र नव्हता पुत्र नसल्याबद्दल भाऊसाहेबांनी श्री स्वामी समर्थांस सांगितले व त्यावर उपाय विचारला त्यावर श्री स्वामींनी उत्तर दिले हरिवंश ऐका म्हणजे मुलगा होईल पुढे त्यांनी हरिवंश ऐकल्यावर त्यांस मुलगा झाला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

श्री स्वामी समर्थांवर पूर्ण निष्ठा ठेवून भाऊसाहेबांनी हरिवंश ऐकला यथावकाश त्यांना मुलगाही झाला त्यामागे श्री स्वामी समर्थांची संकल्पसिध्दीची शक्ती उभी होती नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्तीला महत्त्वाचे स्थान आहे पूर्वी अशिक्षित लोक श्रवणभक्तीने आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध होत सद्यःस्थितीतही जेव्हा जेव्हा फुरसत मोकळा वेळ मिळेल तेव्हा श्रवणभक्ती फायद्याची व अंतिमत समृद्ध करणारी असते श्रवणभक्तीने मन चित्त बुद्धी शुद्ध होण्यास मदत होते भगवंताशी तादात्म्य साधण्यासही साहाय्य होते मानवी मनास जखडलेल्या षडरिपूंची तीव्रता कमी कमी होते या उपासनेच्या सातत्याने संसार प्रपंचात अलिप्तता येते बंधने सैल होऊन मुक्ती मिळते हरिवंश ऐकावा असे भाऊसाहेबांना सांगण्यामागे श्री स्वामी समर्थांचा हाच उद्देश होता भाऊसाहेबांनी निष्ठेने हरिवंश ऐकण्याची श्रवणभक्ती केल्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली श्रवणभक्तीत सातत्य एकाग्रता तादात्म्य अव्यभिचारी निष्ठा आणि निर्मोहीपण असणे केव्हाही फलदायी असते अन्यथा निव्वळ श्रवण करायचे म्हणून करायचे नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे काय उपयोगाचे म्हणून असे श्रवण करण्याने काहीही साध्य होणार नाही श्रवणाभक्तीचे सामर्थ्य अधोरेखित करणारी ही लीला आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या