एके वर्षी पाऊस न पडल्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे सावट दाटले लोकांनी अनेक प्रकारची अनुष्ठाने पर्जन्य सूक्ते शंकरावर अभिषेक इ.चालू केले तरीही पाऊस पडेना एक दिवस श्री स्वामी काशीविश्वेश्वराचे जागृत स्थान असलेल्या जेहूर गावी गेले तेथे काशीविश्वेश्वरावर संततधार चालू होती तेथून ते सेवेकर्यांसह वळसंग गावी गेले तेथेही अनुष्ठान चालू होते लोक श्री स्वामी समर्थास विचारु लागले महाराज पाऊस केव्हा पडेल हे ऐकून महाराज शंकराच्या देवळाच्या गाभाऱ्यात गेले तेथे त्यांनी शंकराचे लिंग गणपती आदि मूर्तींना शिव्या देत  विचारले पाऊस का पाडत नाही तुम्हाला काय हरभरे पाहिजे काय असे विचारुन एकास हरभरे आणण्यास सांगितले त्यांनी हरभरे मुठीत घेऊन देवांच्या मूर्तीवर फेकले आणि ते धर्मशाळेत जाऊन बसले सुमारे अर्ध्या तासानंतर जोराचा वारा सुटला आकाशात ढग जमा झाले मोठा गडगडाट होऊन जिकडे तिकडे पाऊस पडू लागला हा पाऊस तीस कोसाच्या परिसरात तीन दिवस सारखा पडत होता आसपासच्या गावातील मोठया जनसमुदायाने त्यांची षोडशोपचारे यथासांग पूजा करुन आरती केली हात जोडून ते प्रार्थना करु लागले हे भगवान हे सच्चिदानंद हे विश्वपती हे अनाथनाथ हे करुणासागर हरभर्याचे निमित्त करुन पुष्कळ वृष्टी करविली धन्य धन्य सदगुरुराज सर्व दुष्काळ घालवून सुकाळ केला पुढे त्या पावसाने पीकेही चांगली आली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

 वरील लीलाकथा २१ व्या शतकातील तुम्हा आम्हाला चमत्कार वाटण्यासारखी आहे रेडिओ दूरदर्शन संगणक आदि शोध सर्वसामान्यांना सुरुवातीस चमत्कारच वाटले पण आता ते चमत्कार राहिले नाहीत संशोधनाच्या अथक श्रमातून ते जसे साध्य झाले तसेच योगधारणेने योगसाधनेने तपश्चर्या साधना आदिने ते शक्य झाले आहे हे सर्वच प्रचंड कष्ट साध्य असल्यामुळे सर्वसामान्य माणूस अधिक खोलात न शिरत त्यास चमत्कार मानून हात जोडून मोकळा होतो पण हे सर्व घडविताना श्री स्वामींनी त्याचे स्पष्टीकरण न देता जप तप पठण अनुष्ठाने आदि करवून घेतली अशा कृतीने आस्तिकपणा निर्माण होतो श्रद्धा वाढते सश्रद्धेने सकारात्मकता वाढते आपल्या संस्कृतितील ऋषी मुनी साधु संत महात्मे सतपुरुष आणि श्री स्वामी समर्थांसारख्या अवतारी विभूतींनी हेच महत्त्वाचे काम केले समाजात आस्तिकपणा श्रद्धा सदभाव सकारात्मकता रुजविली टिकवली आणि वाढविली पण यात अंधःश्रद्धा व झापडबंदपणा नसावा तसा श्री स्वामींचा अजिबात नसावा त्यांनी लोकांकडून जप पठण अनुष्ठाने पर्जन्यसूक्त अभिषेक आदि करुन घेतले त्यांनी स्वतःही भगवान शंकराच्या देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन स्तोत्रे मंत्रे सूक्ते आदि म्हटली पण त्यावेळच्या लोकांच्या अज्ञानामुळे त्यांना ते नीट समजले नाही श्री स्वामींचा मोठा आवाज देहबोली एकंदर वावर यावरुन त्यांना त्या शिव्याच वाटल्या पण त्या शिव्या नव्हत्या श्री स्वामींनी देवदिकांनाच काय पण सदवर्तनी सत्पुरुषांचासुद्धा कधी अवमान केला नाही मनोबल वाढण्यासाठी सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हे असे करावे लागते हे श्री स्वामींच्या या कृतीवरुन प्रबोधित होते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या