बाबासाहेब जाधव म्हणून सरकारी मानकरी होते त्यांना पुत्र संतान नव्हते पहिली पत्नी वारल्यानंतर दुसऱ्या लग्नाची परवानगी त्यास श्री स्वामी समर्थांनी दिली नाही श्री स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी दुसरे लग्नही केले नाही जवळ असलेली सर्व संपत्ती श्री स्वामी चरणी अर्पण करुन त्यांनी लंगोटी धारण केली होती एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी सरकारवाड्या जवळ लकडखान्यात होती दुपारचे बारा वाजले असता श्री स्वामी बाबासाहेबांस म्हणाले कुंभार तुझे नावाची चिठ्ठी आली आहे (श्री स्वामी बाबासाहेब जाधवास कुंभार म्हणून हाक मारीत असत) श्री स्वामींच्या तोंडून हे वाक्य ऐकताच ते घाबरले त्यांना त्यांच्या डोळ्या समोर अक्राळविक्राळ काळपुरुषाच्या स्वरुपात मृत्यू स्पष्टच दिसू लागला त्याही स्थितीत न घाबरता श्री स्वामी समर्थांचे पाय त्यांनी घट्ट धरले आणि प्रार्थना केली की महाराज आता दुसरी विशेष वासना राहिलेली नाही पण श्री स्वामींची सेवा अद्यापही मनाप्रमाणे घडलेली नाही करिता श्री स्वामी महाराजांनी कृपा करुन तूर्त निरोप देऊ नये श्री स्वामींस त्यांची दया येऊन हाताने निर्देशित करुन जा बैलाकडे असे श्री स्वामी समर्थ म्हणताच जवळच उभा असलेला बैल धाडकन जमिनीवर पडून गतप्राण झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ह्या लीलाकथेतील बाबासाहेब जाधव हा पूर्णतया तन मन धनाने श्री स्वामी चरणी विलीन झाल्याचे दिसते त्यांच्या आज्ञेचे पालन करुन त्यांनी दुसरा विवाहही केला नाही त्या वेळची किंमती स्थावर जंगम म्हणजे सर्वस्वच जाधवाने श्री स्वामी चरणी अर्पण केले होते लंगोटी नेसून निर्लेप प्रवृत्तीने ते संन्यस्त जीवन जगत होते केवढा मोठा हा त्याग ही लीलाकथा वाचताना कदाचित आजच्या जमान्यात सर्वस्व अर्पण करुन लंगोटी नाही नेसता येणार परंतु प्रपंच करुन अथवा करता करता अगर प्रपंचात राहून सुद्धा संन्यस्त तटस्थ त्रयस्थ व निर्मोही निर्लेप वृत्तीने जगता येऊ शकते मात्र प्रयत्नपूर्वक मनाला तसे वळण द्यावे लागेल इतकेच हा ही इथला अर्थबोध आहे साक्षात मृत्यू आला असतानाही जाधवाने जीवदान मागितले ते कशासाठी तर श्री स्वामी सेवा खंडित होऊ नये म्हणून अंतःसाक्षी श्री स्वामींनी ते जाणून जाधवास जीवदानही दिले त्याचे जीवन श्री स्वामी चरणी सार्थकी लागले असे जीवन सार्थकी लावण्याचा आपण प्रयत्न करणे त्यासाठीच श्री स्वामी समर्थांकडे जीवदान मागणे हाही यातला एक लीलाबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या