अक्कलकोटात नाथोबा नावाचा राजाचा एक प्रामाणिक खजिनदार होता त्याची श्री स्वामी समर्थांवर पराकाष्ठेची निष्ठा होती तो सदा सर्वदा नित्य स्वामीरामांचे स्मरण दर्शन आणि पूजन करीत असे तितकाच तो सज्जन आणि सत्तवशील होता काही दुष्टांनी त्यावर कुभांड रचून खजिन्यातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि नाथोबाच्या खजिन्यात तूट आहे असे राजास सांगितले खजिना तपाससण्यात आला त्यात दोन हजार रुपयांची तूट आढळली प्रामाणिक नाथोबाला कैद झाली मी एक पैसुध्दा खाल्ली नाही आणि इतकी तूट कशी आली असे म्हणून तो धाय मोकलून रडू लागला श्री स्वामींचा धावा करु लागला श्री स्वामींस नाथोबाची दया आली दुसरे दिवशी गुरुवारी राजेसाहेब व कारभारी दाजीबा भोसले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले ते दोघेही दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले तसेच त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी कडाडले काय रे मादरचोदांनो असाच खजिना मोजता काय आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल श्री स्वामींचे हे उदगार ऐकताच ते दोघेही भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करु लागले लगोलग राजवाड्यात येऊन त्यांनी खजिना मोजला तर तो बरोबर भरला एक पैशाचीही तूट त्यात नव्हती  त्या दोघांना पश्चात्ताप झाला नाथोबाला कैदेतून सोडण्यात आले त्या दोघांनी त्याची क्षमा मागून नाथोबास कामावर येण्याची विनंती केली आता चाकरी करावयाची नाही अशी शपथ घेऊन तो श्री स्वामींची अखंड सेवा करु लागला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

नाथोबा स्वामीभक्त होता त्यांना स्मरुन तो त्याला नेमून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत होता त्यामुळे तो समाधानी आनंदी तृप्त होता राजेसाहेब आणि कारभारी दाजिबा भोसले हे अक्कलकोट संस्थानाचे जबाबदार राज्यकर्ते आणि जनतेचे पालनकर्ते होते परंतु त्यांचे वर्तन राजधर्म पाळणारे नव्हते श्री स्वामींना हे ठाऊक होते म्हणूनच ते त्या दोघांवर संतापले वास्तविक अशा जबाबदार व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा करावयास पाहिजे त्यांच्यात आचार विचार परिपक्वता असावयास हवी ती त्या दोघात नव्हती त्यांच्याकडून अधर्मी अन्यायकारक कृत्य घडले होते परंतु नाथोबाच्या पाठीशी स्वामीबळ होते त्याचा प्रत्यय त्यास आला त्या दोघांवर त्याची क्षमा मागण्याची वेळ आली अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी वचनाची त्यास प्रचिती आली चांगल्या आचार विचाराचा रक्षणकर्ता परमेश्वर असतो की भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही है सर्वपरिचित वचनाचा बोध येथे होतो .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या