गोपाळबुवा हचनाळ गावच्या एकुलत्या एक विहीरीवर दुसऱ्या दिवशी सकाळी गेले त्या विहीरीवर एकदोन ब्राम्हणांव्यतिरिक्त बाकी सर्व शूद्रच होते बुवांनी ब्राम्हणाकडे मोठे भांडे मागितले पण त्याने ते बुवांस काही दिले नाही तेव्हा स्नान करण्याचा बुवांपुढे प्रश्न पडला मराठा मनुष्याजवळून घागर घेऊन बुवांनी स्नान केले इतर सेवेकर्यांसह महाराजांना गुडगुडी पाजणार्याने बुवांस उद्देशून निर्भर्सना केली अरे हा कोकण्या बुवा बाटला त्याच्या हातचे पाणी घेऊ नका हे ऐकून बुवास रडूच कोसळले शेवटी सर्वांच्या संमतीने बुवास श्री स्वामी समर्थांचे चरणतीर्थ श्रीपाद भटाने दिले आणि शुद्ध करुन घेतले दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आमरसाच्या भोजनाचा कार्यक्रम होता समाराधनेचे उदक सुटले सर्वजण भोजनास बसणार इतक्यात काही मंडळी म्हणाली त्या कोकण्याचे बुवाचे पान पंक्तीबाहेर ठेवा त्यावर श्रीपाद भट म्हणाले याला श्री स्वामी समर्थांचे चरणतीर्थ देऊन शुद्ध केले आहे आता वेगळे पान ठेवण्याची गरज नाही परंतु बळवंतरावाने गोपाळबुवांचे पान पंक्तीतून ओढून बाहेर ठेवले आणि बुवास जागेवरुन उठवून जा तिकडे बैस पंक्तीत बसू नको असे सांगितले गोपाळबुवा निमूटपणे उठले पण सर्वांसमक्ष झालेल्या अप्रतिष्ठेची बोच त्यांच्या मनास लागली आता आपला कैवारी कोण असा मनोमन विचार करुन पलीकडे पंक्तीबाहेर ओढून ठेवलेल्या पानावर बुवा मुकाट्याने जाऊन बसले सर्वांसमक्ष झालेल्या अपमानाचे कढ त्यांच्या मनात येत होते श्री स्वामींशिवाय त्यांचा कैवारी कुणीच नव्हता रडत रडत झालेल्या अपमानाचे आवंढे गिळत बुवांचे जेवण चालले होते श्री स्वामी समर्थांसाठी पान वाढून ठेवले होते त्यावर ते येऊन बसले नाहीत ताट वाढून त्यांच्याकडे नेले ताट पाहताच ते शिव्या देऊ लागले त्यांनी अति उग्र रुप धारण केले ते दोन चार वेळा म्हणाले आम्ही बाटलो आम्हास शिवू नका मादरचोद आम्ही जेवत नाही असे नरसिंहरुप धारण करुन ते जे उठले ते एका उकिरड्यावर जाऊन बसले कोणालाही पुढे येऊ देईनात असे सायंकाळपर्यंत चालले श्री स्वामी समर्थ आपले कैवारी आहेत याची प्रचिती बुवास श्री स्वामींच्या या कृतीतून आली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ हे सदेह स्वरुपात वावरत असताना सुध्दा शिवाशिव छूत अछूतपणा किती तीव्र होता याची कल्पना या लीलेवरुन येते पण श्री स्वामी समर्थांना जातिव्यवस्थेच्या शिवाशिवीच्या ह्या गोष्टी अजिबात मान्य नव्हत्या यावरुन तुमची आमची मनोधारणा व प्रवृत्ती घडण्यास कोणतीही अडचण नसावी श्री स्वामी समर्थांच्या सहवासात सदैव राहाणार्या त्यांना गुडगुडी पाजणार्या बळवंतरावांसारख्या अनेक कर्मठांच्या मनातील सोवळ्या ओवळ्याचे बंड तेव्हाही काही शांत झाले नव्हते तेव्हाची कर्मकांडे रुढी परंपरा प्रथा आदींचे मानसिक ओझे वागवत सेवेकरी फक्त शरीराने स्मशानात महारवाड्यात दर्ग्यात उकिरड्यावर अथवा अन्य गलिच्छ वा अपवित्र (सेवेकर्यांच्या दृष्टीने ) जागी फिरत होते पण स्वच्छतेचे सोवळ्या ओवळ्याचे जाती पातीचे स्तोम ते लोक माजवीत होते श्री स्वामी समर्थांसारखा सदेह भगवंत जवळ असूनही त्यांना तो कळत नव्हता समजत नव्हता की उमजत नव्हता हा लीलाकथेतील महत्त्वाचा बोध आहे श्री स्वामी समर्थांनी सर्वांचीच कानउघाडणी करुन त्यांना काय अपेक्षित होते हेही निदर्शनास आणून दिले या लीलाकथेवरुन जगात ज्याला कोणी कैवारी (वाली) नाही त्याला आपण वाली आहोत हे श्री स्वामींनी गोपाळबुवांचा कैवार घेऊन दाखवून दिले पुढे बळवंतरावांसारख्या अविवेकी कर्मठास वेड लागले तो कायमचाच वाया गेला श्री स्वामी समर्थांच्या शिक्षाही अशा कठोर असतात याचीही येथे नोंद घेणे आवश्यक आहे .

श्री स्वामी समर्थ 



Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या