ठाकूरदास अक्कलकोटात पत्नी राधाबाईसह श्री स्वामी समर्थांची मनोभावे नित्य सेवा करीत असता एके दिवशी बुवा दर्शनास आले असता श्री स्वामी समर्थांनी जवळच्या पेटत्या धुनीतील एक जळके लाकूड (काष्ठ) बुवांचे अंगावर फेकले सेवेकर्यांनी जयजयकार करुन बुवांस सांगितले की तुमचे काम झाले पुढे बुवा ते जळके काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रित करुन त्याचा लेप त्यांच्या अंगावरील कुष्ठावर (कोडावर) नित्य लावू लागले काही दिवसांत बुवांच्या अंगावरचे संपूर्ण कोड नाहीसे झाले बुवांची पत्नी राधाबाईसुध्दा श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे त्या उभयतास पुत्रसंतान नव्हते राधाबाईने श्री स्वामींस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली श्री स्वामींनी त्यांच्या डोकीतील टोपी काढून राधाबाईच्या ओटीत फेकली तिने श्री स्वामींचा महाप्रसाद समजून श्री स्वामी समर्थास साष्टांग नमस्कार केला पुढे बारा महिन्यांच्या आत तिला पुत्र झाला त्याचे नाव गुरुनाथ ठेवले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

श्री स्वामी समर्थांची अनन्य भावाने एकनिष्ठपणे सेवा करणाऱ्याच्या मनोकामना पुर्या करणाऱ्या श्री स्वामींच्या अनेक लीलांपैकी ही एक मनोज्ञ विचार करावयास लावणारी लीला आहे आता कालमानपरत्वे जळाऊ लाकूड आणि भस्म एकत्रित करुन कुणी अंगावरील कोड घालवणार नाही कुणास असा प्रसाद सद्यःस्थितीत मिळणार नाही हे खरे आहे परंतु श्री स्वामींवरील अनन्य निष्ठेने सेवेने दुःख पीडा हरण होतात हे त्यामागील आचार विचार सूत्र आहे श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व असामान्यत्व कर्तुम अकर्तुम सामर्थ्य समजावून घ्यावयास हवे हा या लीलेमागचा गर्भित हेतू आहे श्री स्वामी समर्थांना मूर्तिपूजा सोवळे ओवळे यांचे अवडंबरत्व शरीर व मनास क्लेषकारक व्रतवैकल्ये कर्मकांडाचे स्तोम मान्य नव्हते परंतु पूजे अर्चेतील उपासनेतील शुद्ध निर्मोही भावभक्तीला महत्त्व देत आजही निर्गुण स्वरुपातील श्री स्वामी समर्थ त्यांची अनन्य भावे सेवा करणाऱ्यास मै गया नही जिंदा हूँ आणि भिऊ नकोस मी पाठीशी आहे असे अभिवचन सदैव देत असतात .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या