बावडेकरांनी केलेल्या दृढ निश्चयास सहा महिने झाले शेवटी ते कंटाळले आणि लोकांजवळ सांगू लागले की मी या जन्मात फारसे पातक केलेले माझ्या स्मरणात नाही आणि तरीही महाराजांचा राग मजवर इतका का असावा वेश्या मुसलमान महार वगैरे लोकांशी महाराज केव्हा केव्हा प्रेमाने वागतात आणि मजवर कधीच कृपादृष्टीने का अवलोकन करीत नाहीत बुवांचे हे मनोगत ऐकून लोक म्हणाले तसेच तुमचे काही पातक असेल बुवा बिर्हाडी आले त्यांना अति पश्चात्ताप झाला त्यांना काही केल्या चैन पडेना जगण्यापेक्षा मरण फार उत्तम असा विचार करुन बुवा मध्यरात्री मुसलमानांचे स्मशान खाजापिराच्या दर्ग्याच्या पलीकडे एका लहानशा डोंगरात एक गुहा आहे तेथे जाऊन बसले सकाळी एक प्रहर दिवस आल्यावर म्हातारी आई आणि बायको अजून का येत नाहीत अशी वाट पाहून बुवांची बसण्याची जेवढी म्हणून ठिकाणे होती त्या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी बुवांचा तपास केला दोन तीन वेळा श्री स्वामी समर्थांकडे जाऊन तेथील मंडळींना बुवांबाबत विचारले परंतु त्यांचा पत्ता काही लागेना असे होता होता सायंकाळ झाली तथापि बुवांचा शोध कोणी सांगेना बुवांच्या म्हाताऱ्या आईने व बायकोने त्या दिवशी काही खाल्ले नाही रडून रडून त्या दोघींचे डोळे सुजले ती रात्रही निघून गेली कोणी म्हणत बुवा कुठे गावास गेले असतील त्यावर बुवांची म्हातारी मातोश्री म्हणे मला सांगितल्याशिवाय कुठे जावयाचा नाही असे होता होता तोही दिवस गेला बुवांचा शोध कोठेच लागेना.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
बावडेकर बुवांचा दृढ निश्चय या अगोदरच्या कथाभागात आपण बघितला बुवांच्या जागी एखादा दुसरा कमकुवत आचार विचाराचा असता तर त्याने हा गुरु नाही तर दुसरा असे म्हणून दुसरी वाट धरली असती येथे बुवांचा निश्चय प्रबोधित होतो मी या जन्मात फारसे पातक केलेले माझ्या स्मरणात नाही आणि तरीही महाराजांचा राग मजवर इतका का असावा वेश्या मुसलमान महार वगैरे लोकांशी महाराज केव्हा केव्हा प्रेमाने वागतात आणि मजवर कधीच कृपादृष्टीने का अवलोकन करीत नाहीत बुवांच्या मनोगतात बुवा श्री स्वामी समर्थांवर प्रेमळ हक्काने रुष्ट झालेले दिसतात श्री स्वामींचा इतर लोकांशी असलेल्या वर्तनाचाही उल्लेख येथे आला यातून बुवांचा सुप्त अहंकार आणि त्या लोकांपेक्षा आपण केव्हाही उच्च दर्जाचे विद्वान पंडित आहोत असे दिसते असे असूनही श्री स्वामी आपल्यावर का रुष्ट आहेत याचा उलगडा मात्र त्यांना काही केल्या होत नव्हता हेच बुवांचे अज्ञान सम सकला पाहू अशी दृष्टी आणि दृष्टिकोन असलेल्या श्री स्वामींना ते खटकत होते तेव्हा तुम्ही आम्हीही हा भेदा भेद भ्रम अमंगळ न ठेवता श्री स्वामींची मनोभावे उपासना करावी हा इथला अर्थबोध आहे सदगुरुंच्या कृपा प्राप्तीसाठी कठोरातल्या कठोर परीक्षा द्याव्या लागतात याचा त्याक्षणी तरी बुवास विसर पडला होता म्हणूनच त्यांच्या उद्वेगातून वरील मनोगत व्यक्त झाले प्रारब्धाचा संचिताचा एक सिद्धांत आहे सदगुरु प्रारब्ध अथवा संचित टाळत नाहीत बदलत नाहीत फारतर गुरुबळ देऊन ते भोगण्याचे सामर्थ्य देतात बुवांबाबत श्री स्वामींनी ते केले याचा वृत्तांत पुढे आहे पण बुवा उतावीळ झाले होते आपणसुद्धा आपले प्राक्तन प्रारब्ध संचित थोड्याशा उपासनेने बदलत जावे व लगेच आपणास फलप्राप्ती व्हावी अशी इच्छा धरतो पण ते चुकीचे आहे येथेही जगण्यापेक्षा मरण फार बरे असे बुवा म्हणतात व निर्जन अशा डोंगराच्या गुहेत जाऊन बसतात पण त्यांची गुरुभक्ती बदललेली नाही हे मात्र येथे लक्षात घेण्यासारखे आहे निःस्सीम गुरुभक्तीचा अर्थबोध बुवांच्या या कृतीवरुन निश्चितच घेण्यासारखा आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या