बिबा घोलपाने विचारलेल्या प्रश्नावर महाराज म्हणाले आम्ही अक्कलकोटास असतो तुझ्या कर्माचे फळ देण्याकरिता आताच आलो हे ऐकताच बाबा घोलपाचे अष्टभाव दाटून आले हे साक्षात ईश्वर आहेत असेच त्यास वाटले क्षणभर त्यांचे देहभानही नाहीसे झाले थोड्याच वेळात देहभानावर येऊन हात जोडून म्हणाले माझ्या कृतकर्माचे मला फळ देण्याकरिताच जर आपण येथे आला असाल तर माझे अनंत जन्मीचे पुण्य आज उदयास आले असे मी म्हणेन तर आता अनाथाची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फळ मला द्यावे बाबा घोलपाच्या असलेल्या शंकांचे निरसन करुन तेथेच त्यांना अनुग्रह केला नंतर बाबा घोलप प्रार्थना करु लागले हे चरण आमच्या आश्रमाला लावून आश्रम पवित्र करावा श्री सदगुरुरायास घरी नेऊन यथाशक्ति पूजा करुन समागम करावा असे मनात येत नाही तोच ती दिव्य मूर्ती पाहता पाहता अदृश्य झाली धन्य महाराज असे म्हणत आणि श्री स्वामी नामाचा जयजयकार करीत ते घरी आले एक दोन दिवसांनी ते अक्कलकोटास निघाले तेथे पोहोचताच गंगेवर पाहिलेली तंतोतंत मूर्ती ती हीच त्यांनी साष्टांग नमस्कार दंडवत घालताच महाराज म्हणाले नाशिकहून केव्हा आलात बाबा घोलपाला खूण पटली त्यांच्या मनाची उन्मनी अवस्था झाली पुढे काही दिवस सदगुरु श्री स्वामींचा समागम करुन श्री स्वामींच्या पादुका घेऊन नाशकास आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वरील लीलाकथा भाग वाचल्यानंतर बाबा घोलपासारख्या वेदशास्त्रसंपन्न स्वधर्मात पराकाष्ठेचे निष्णात असलेल्या तपश्चर्येच्या योगाने चित्तशुद्धी झालेल्या बाबा घोलपाने त्यांच्या मनातील प्रश्न अनेकांना विचारले पण कर्म फलाबाबत त्यांना कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही ते दिले फक्त एकमेव श्री स्वामी समर्थांनी त्यावर बाबा घोलपांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे माझ्या कृतकर्माचे मला फळ देण्याकरिताच जर आपण येथे आला असाल तर माझे अनंत जन्मीचे पुण्य आज उदयास आले असे मी म्हणेन तर आता अनाथाची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फळ मला द्यावे ही प्रतिक्रिया मूळातून वाचल्यानंतर श्री स्वामींची श्रेष्ठता योग्यता एकज्ञानी चिकित्सक अभ्यासू माणसही कशी मान्य करतो याचा प्रयत्य येतो तेव्हा सामान्यांना श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्यांचा योग्य तो बोध होतो असे हे बाबा घोलप अक्कलकोटला आल्यावर गोदाकाठी पाहिलेली संन्याशाची मूर्ती आणि वडाच्या झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली मूर्ती ती हीच अशी त्यांना ओळख पटली बाबा घोलपांचा क्षणभर स्वतःवरच विश्वास बसेना श्री स्वामींस दंडवत घालीत असताच महाराज बाबा घोलपास म्हणाले नाशिकहून केव्हा आला बाबा घोलपांना आता खात्रीशीर खूण पटताच त्यांच्या मनाची उन्मनी अवस्था झाली या उदगारातून आपल्याही मनात श्री स्वामी समर्थांबद्दलचा भक्तिभाव अधिक दुणावतो श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाची कल्पना येते बाबा घोलपांची एकनिष्ठ ईश्वर उपासना फलद्र्प होऊन सदगुरुच त्यांच्याकडे आले तुझ्या कर्माचे फळ देण्यासाठी आलो याचाच अर्थ श्री स्वामींनी त्यांना सूचित केले की तुझी भक्ती सेवा माझ्या चरणी रुजू झाली यातून आपण असे बोधित होतो की गुरू ओळखण्याची पात्रता उपासनेने संपादन करावी भडक उत्सवी आणि उन्मादी प्रचाराला बळी पडून कुणाच्याही नादी लागू नये हुरली मेंढी लांडग्याच्यामागे अशी अवस्था होऊ देऊ नये उपासना वाया जात नाही धीर धरा रे धीरा पोटी असती फळे रसाळ गोमटी निदान अध्यात्मात तरी हे सूत्र आणि बाबा घोलपांचा कथा भाग नेहमीच लक्षात ठेवावयास पाहिजे जे पेरले जाते तेच उगवते या आशय सूत्रावरुन आपले कर्म कसे आहे त्यावर भगवंताची कृपा अवलंबून असते यासाठीच आपल्या नित्य कर्मात सत्यम शिवम सुंदरम चा आशय व अर्थ असावा बाबा घोलप प्रखर तपश्चर्येने शुद्ध चित्त अवस्थेपर्यंत पोहचले होते तेव्हा निव्वळ पूजा आर्चा यात्रा पारायणे अनुष्ठाने करण्यात काहीच अर्थ नाही ती श्रम वेळ पैसा वाया घालविणारी एक शुष्क आणि व्यर्थ कवायत ठरते उपासनेतून वा साधनेतून चित्तशुद्धी साधावी म्हणजे भगवंताची भेट होणे सोपे जाते हा फार लाख मोलाचा मथितार्थ बाबा घोलपांच्या कथा भागातून व्यक्त होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या