एकदा बाळाप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागला त्यामुळे तो फार आजारी झाला इतका की त्याला जागेवरुन उठवेना एक दिवस तर फारच रक्तस्त्राव होऊन बेंबीवाटे कागदाची पुडी निघाली ती उघडून पाहता त्यात कसलासा काळा विषासारखा पदार्थ दृष्टीस पडला आजूबाजूच्या चार पाच लोकांनाही तो पदार्थ पाहून आश्चर्य वाटते तेव्हा बाळाप्पास असे स्मरण झाले की तीन वर्षांपूर्वी बाळाप्पाची व्यापारात भरभराट झालेली सहन न होऊन एका द्वेषी इसमाने कानवल्यातून बाळाप्पास विष घातले असावे म्हणजे त्याच्यावर तेव्हा विषाचा प्रयोग केला होता गेली तीन वर्षे ते विष पोटात असूनही केवळ श्री स्वामी समर्थ कृपेमुळेच हे सारे निभावले याबाबत बाळाप्पाची खात्री पटली असे आणखी दोन चार चमत्कार त्यांच्या अनुभवास आल्यानंतर दिवसेंदिवस बाळाप्पाची श्री स्वामी समर्थ चरणी भक्ती दृढ होत गेली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
बाळाप्पाचा व्यवसायातील उत्कर्ष सहन न होऊन त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा उल्लेख या लीलाकथा भागात आहे तेव्हा काय आणि आता काय मत्सरी आणि कोत्या मनोवृत्तीची माणसे समाजात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे तेव्हाच्या कथेतील विषप्रयोगा ऐवजी सद्यःस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने लोक मत्सर करीत असतात प्रसंगी जीव घेऊन काटा काढीत असतात पण येथे जसे बाळाप्पास श्री स्वामी समर्थांचे संरक्षक कवच लाभले होते तसे सर्वांना सदा सर्वदा ते लाभेलच असे नाही अर्थात आताही श्री स्वामी समर्थांची मनोभावे उपासना करणाऱ्यास त्यांच्या कृपेचा लाभ होतोच आणि भिऊ नकोस मी पाठीशी आहे या त्यांच्या अभिवचनाचा प्रत्यय येतो यासाठी बाळाप्पा सारखे सदैव गुरुशरण राहून सदैव त्यांची भक्ती करावी हाच बोध यातून मिळतो या कथेत बाळाप्पावर कोण्या दुष्टाने मत्सरी वृत्तीतून तीन वर्षांपूर्वी विषप्रयोग केला होता त्यास फारसा अपाय न होता ते विष त्याच्या शरीरात एवढया दीर्घकाळ राहिले आणि नंतर ते बेंबीवाटे बाहेर पडले यातून श्री स्वामी समर्थांसारख्या भगवंत स्वरुप गुरुची कृपा किती असीम असते याचाही बोध होतो.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या