अक्कलकोटात खास बागेत गाणदेवी म्हणून दगडास शेंदूर फासलेली देवी होती सर्व गावास त्यावेळी तिचा दरारा होता दोन प्रहरी अगर सायंकाळी तेथून जाणाऱ्या स्त्रीया व मुलांना ती झपाटते मग नारळ कोंबडे इ.या नैवेद्य दिल्याशिवाय ही गाणदेवी संतुष्ट होत नसे असा तिचा लौकिक होता त्यामुळे सर्वजण तिला घाबरत श्री स्वामींनी ते पाहिले शेंदूर फासलेल्या गाणदेवी म्हणून तेव्हा मान्यता पावलेल्या त्या  दगडावर श्री स्वामी काही दिवस नित्यनेमाने लघवी व शौच करु लागले त्यामुळे लोकांच्या मनातील त्या देवीविषयी भीती नाहीशी झाली त्यानंतर लोकांनी त्या देवीस भजणे सोडून दिले 


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

श्री स्वामी समर्थांची ही कृती निश्चितच सुधारणावादी आणि सर्वसामान्यांच्या मनातील देव देवतांबाबतचे अज्ञान दूर करणारी आहे त्या काळात अशा तर्हेची क्रांतिकारी कृती करुन श्री स्वामींनी लोकांमध्ये मोठी जागृती व सजगता निर्माण केली परमार्थात डोळसपणा आणि विवेकशील आचार विचार असावा हेच श्री स्वामींना अपेक्षित होते अंधश्रध्दा त्यातून निर्माण झालेली अनुकरणशीलता त्यांना मान्य नव्हती लोकांनीही ती मान्य करु नये यासाठीच त्यांनी वरील कृती करुन लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले या कृतीतून त्यांना सर्वसामान्य लोकांच्या मनात देवीबाबत असलेला भ्रम भय शंका दूर करावयाची होती अंधश्रध्दा प्रवाद अफवा याबाबत सारासार विवेक हवा उपासकाचे मन हे सदैव भय भ्रम आणि संशय विरहित असावे म्हणूनच या लीलेत श्री स्वामींनी अक्कलकोटातील गाणदेवीसंबंधीची अंधश्रध्दा निपटून लोकांच्या मनातील अनाठायी भीती दूर केली श्री स्वामी समर्थांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात घडणाऱ्या या लीलेतून निश्चितच बोध घेण्यासारखा आहे एकोणिसाव्या शतकातले आम्ही लोक सुधारणावादी म्हणवतो पण आजही आम्ही नारळ कोंबडे बकरे देवाला अर्पण करतो शनीला तेल वाहतो हे विचित्र नाही काय हा कुळाचार की खुळाचार

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या