एकदा अक्कलकोटच्या राजाचा जव्हार नामक हत्ती अतिशय उन्मत्त झाला इतका की कोणत्याही मनुष्यास त्या रस्त्याने जाण्याची भीती वाटू लागली त्याच्या चारही पायास साखळदंड बांधले असतानाही तो सोंडेने दगडांचा वर्षाव करु लागला त्याच्या भीतीने गाई म्हशी त्या रस्त्याने जाण्याच्या बंद झाल्या गावातील लोकांसही भीती वाटू लागली कारण तो सुटून कोणाचा प्राण घेईल याचा नेम नव्हता राजाने त्या हत्तीच्या बंदोबस्तासाठी त्याच्या आजूबाजूस सशक्त शिपाई आणि घोडेस्वार ठेवले होते राजा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येऊन त्यांना प्रार्थना करु लागला की महाराज आमचा हत्ती मस्त होऊन फारच बेफाम झाला आहे लोकांस त्याची फार भीती वाटू लागली आहे तर गोळी घालून त्यास ठार मारावा की काय त्यावर श्री स्वामी म्हणाले अरे त्याला मारु नकोस असे सांगून सेवेकर्यांसह ते हत्ती कडे निघाले वाटेत लोक त्यांना सांगू लागले महाराज त्या रस्त्याने जाऊ नका हत्ती मोठ मोठे दगड सोंडेने सारखा फेकीत आहे काही सेवेकरी हत्तीच्या भीतीने मागे फिरले चोळाप्पा बाबा यादव मात्र श्री स्वामीं समवेत राहिले श्री स्वामी समर्थ कटीवर हात ठेवून त्या मदोन्मत्त जव्हार हत्तीपुढे उभे राहिले त्यास शिव्या देऊन म्हणाले मूर्खा माजलास काय पूर्वीचे स्मरण विसरलास वाटते चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे श्री स्वामींचे हे उदगार ऐकताच जव्हार हत्ती शांत होऊन श्री स्वामी समर्थांजवळ आला पुढच्या पायाचे गुढघे टेकून त्याने गंडस्थळ श्री स्वामी चरणावर ठेविले त्याच्या डोळ्यांतून घळ घळा अश्र् वाहत होते.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेतील राजाच्या जव्हार हत्तीने उन्मत्त होऊन लोकांवर व गाई म्हशींवर कशी दहशत निर्माण केली होती याचे वर्णन आले आहे शेवटी राजा श्री समर्थांकडे येऊन त्यांना सांगू लागला महाराज त्या मदोन्मत्त हत्तीच्या उच्छादापासून लोकांना गाई गुरे म्हशी आदींना वाचविण्यासाठी जव्हार हत्तीस ठार मारावा की काय असे विचारल्यावर सर्वांप्रती दया भाव असलेले श्री स्वामी राजास सांगतात अरे त्याला मारु नकोस श्री स्वामींचे हे उदगार आपणास काय प्रबोधित करतात सर्वाभूती दयाभाव आणि प्रेम असावे हेच ना जगा आणि जगू द्या हे मानवता वादी तत्त्व ना काही सेवेकर्यांसह श्री स्वामी समर्थ त्या खवळलेल्या जव्हार हत्तीकडे निघतात तेव्हा लोक त्यांना त्या रस्त्याने जाऊ नका म्हणून सांगतात त्या बिचाऱ्यांना काय कल्पना की श्री स्वामी समर्थमहाराज हे चालते बोलते भगवान परब्रम्ह आहेत म्हणून लोक त्यांना थोडेसे वेगळे परंतु त्यांच्या सारखेच समजत होते याही पेक्षा खेदाची गोष्ट अशी की श्री स्वामी बरोबरचे सर्वच सेवेकरी चोळाप्पा आणि बाबा यादव वगळता हत्तीच्या भीतीने माघारी फिरले याचा अर्थ सेवेकर्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ नीट समजले नव्हते एक वेळ सामान्य लोकांचे ठीक पण सेवेकरी म्हणवून घेणारे निकटच्या सहवासात राहणाऱ्यानेही भीतीने माघारी फिरण्याची अशी पळपुटी पलायनवादी वृत्ती सदगुरु श्री स्वामी समर्थांसारखा पाठीराखा सोबत असताना त्या खवळलेल्या हत्तीचीच काय पण काळाचीही भीती बाळगण्याचे त्यांना खरेतर कारण नव्हते पण त्यांची एवढी पोच आणि समज नव्हती हेच खरे श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याचे नीट आकलन करुन घेणे हे प्रत्येक स्वामी सेवेकर्यांचे कर्तव्य आहे श्री स्वामी जेव्हा कटीवर हात ठेवून त्या खवळलेल्या हत्तीला खडसावतात तेव्हा त्या हत्तीच्या झालेल्या स्थितीचे सविस्तर वर्णन लीलेत आले आहे हत्तीलासुद्धा श्री स्वामी समर्थांमधील देवत्व उमजले समजले म्हणून तर त्याने गुडघे आणि गंडस्थळ श्री स्वामी चरणावर टेकविले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने एवढा खवळलेला जव्हार हत्ती लीन दीन होऊन अश्र् ढाळू लागला हत्तीसारखा एका मुक्या जीवासही श्री स्वामी समर्थांमधील देवत्व समजल होतं उमगलं होतं आणि आम्हाला या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या व्यक्तीने स्वतःच्या निर्मळ स्वच्छ प्रामाणिक शुद्ध आचार विचार आणि व्यवहाराने मिळवावयाचे आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या