कर्नाटक प्रांतातील तंबगावचा गोविंद भट श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता एके दिवशी तो शेजारच्या व्हार्ली गावी वीरभद्राचे दर्शनीय स्थान आहे तेथे गेला त्या स्थानी राचाप्पा नावाचा वीरभद्राचा निस्सीम भक्त असलेला एक जंगम होता तो उत्तम कवने करणारा होता परंतु वीरभद्राशिवाय इतर देवदेवतांवर तो कवने करीत नसे गोविंद भटजीची व राचाप्पाची गाठ भेट झाल्यावर तो राचाप्पास म्हणाला श्री स्वामी समर्थ दत्त अवतार आहेत तरी आपण त्यांचे गुण वर्णन करावे (म्हणजे त्यांच्यावर कवने करावीत ) त्यावर राचाप्पा म्हणाला मी एका ईश्वर वीरभद्राशिवाय इतर देवदेवतांवर कवन करीत नाही राचाप्पाच्या या उत्तराने गोविंद भटजीस दुःख झाले श्री स्वामी समर्थांचा अनादर झाल्याचे मानून त्याने सात दिवस अन्नपाणी वर्ज्य करुन समर्थ तो नामाचा घोष करीत बसला गोविंद भटाच्या दृढ निश्चयाने श्री स्वामींनी राचाप्पाच्या स्वप्नात जाऊन आज्ञा केली की मी आणि वीरभद्र यात भेद न मानता आमचे गुणवर्णन कर जर भिन्नभाव मानशील तर दुःख पावून अधोगतीला जाशील अरे राचाप्पा उठ उठ आणि लवकर गोविंद भटाचे घरी जा त्याचेजवळ क्षमा मागून साष्टांग नमस्कार घाल संशय धरु नको राचाप्पाने दुसरे दिवशी तंब गावी जाऊन गोविंद भटाची क्षमा मागून त्यास सांगितले आपल्याकरिता मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले माझ्या कुळाचा उध्दार झाला असे म्हणून तो श्री स्वामींचे गुणवर्णन करु लागला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेतून गोविंद भटाच्या निस्सीम भक्तीचे दर्शन होते राचाप्पाच्या डोळ्यासमोर वीरभद्राशिवाय अन्य कोणताही देव नाही पंथ संप्रदाय नाही याचा जबरदस्त पगडा असल्याचे दिसते परंतु श्री स्वामींनी एकनिष्ठ भक्तीला दाद दिल्याचे यातून दिसते त्यामुळेच त्यांनी राचाप्पाला स्वप्नदृष्टान्त देऊन सांगितले की वीरभद्र आणि माझ्यात भेद मानू नको म्हणजे वेगवेगळ्या देवदेवतांची सगुणरुपे भिन्न असतीलही परंतु त्या सर्वांचे मूळ रुप एकच आहे हाही बोध येथे होतो आमचा देव धर्म पंथ श्रेष्ठ तुमचा देव धर्म पंथ कनिष्ठ असा भेदभाव करुन एकमेकांस कमी लेखणे एकमेकांची उणीदुणी काढणे हेही धार्मिक पारमार्थिक अथवा आध्यात्मिकदृष्टया गैर आहे याचाही बोध या लीलेतून होतो .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या