नाशिक पंचवटीतील बाबा घोलप म्हणून वेदशास्त्रसंपन्न यजुर्वेदी ब्राम्हण होते ते त्यांच्या स्वधर्मात निष्णात होते त्यांच्या प्रखर तपश्चर्येने त्यांची चित्तशुद्धी झाली होती ते प्रचंड विद्वान असूनही त्यांचे वर्तन साधे आणि गर्वरहित होते लहान थोर विद्वान अविद्वान गरीब श्रीमंत ब्राम्हण शूद्र आदि सर्वांबरोबर त्यांचे वर्तन समान होते काही काळ लोटल्यानंतर त्यांच्या कर्मक्षयाची वेळ जवळ आली कोणी तरी साक्षात्कारी पुरुष मला भेटून मला कृतकार्य करील असे त्यांच्या मनात चिरंतन चिंतन चालले असे त्यांनी नाशिक क्षेत्री येणाऱ्या पुष्कळ साधू संत महात्मे यांच्याशी समागम करुन त्यांना प्रश्न विचारले पण त्यांचे समाधान झाले नाही नित्याप्रमाणे बाबा घोलप गंगेवर (गोदावरीवर) स्नानास गेले स्नान आटोपल्यानंतर ते जपास बसले असताना त्यांना समोरून एक संन्यासी येताना दिसला संन्यासी जवळ आल्यानंतर बाबा घोलपांचे डोळे त्या दिव्य तेजाने दिपून गेले उंच अजानुबाहू अशा त्या स्वरुपास बाबा घोलपांनी हात जोडून विनवणी करीत विचारले महाराज आपण कोण कोठे असता येथे केव्हा आलात.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथा भागात नाशिकच्या पंचवटीतील बाबा घोलपांच्या विद्वान तरीही विनम्र आणि सर्वांप्रती समभाव असलेल्या एका सोज्वळ आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो सर्व स्वामीभक्तांनी आणि गुरुच्या शोधात फिरणार्यांनी साधक कसा असावा हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे साक्षात्कारी सत्पुरुषाला भेटण्याची तीव्र इच्छा बाबा घोलपाच्या मनात निर्माण झाली त्यासाठी त्यांनी सुरुवातीस प्रयत्नही केले अर्थात असे प्रयत्न कुणाही सच्च्या साधकास करावेच लागतात ते करताना नाउमेद होऊन चालत नाही बाबा घोलपांचे निरंतन चिंतन साक्षात्कारी सत्पुरुषासाठी होते त्यांचा तोच एक ध्यास चालू असताना एके दिवशी श्री स्वामी समर्थच एका संन्याशाच्या स्वरुपात त्यांना दिसले पण बाबा घोलपांनी निश्चित उलगडा व्हावा म्हणून त्या संन्याशास काही प्रश्न विचारले या घटनेअगोदरही त्यांनी अनेकांना प्रश्न शंका विचारल्या होत्या परंतु त्यांचे तेव्हा समाधान झाले नव्हते पण यावेळी मात्र त्यांचे समाधान झाले ह्या लीला भागावरुन कुणासही साधकाचे वर्तन सम सकला पाहू असेच असावे साधनेत यश अथवा फलप्राप्ती मिळवावयाची असेल तर बाबा घोलपा सारखा उपासनेत व्रतस्थपणा असावा तो असल्यास उपासकाचा कर्मक्षय होऊन त्यास दृष्टांत होतोच होतो हा दृढ विश्वास असावा हाच इथला आध्यात्म बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या