मोगलाईत नलदुर्ग गावी गोपाळ आणि मारुती हे सख्खे भाऊ राहात होते त्यांना एक सावत्र भाऊ होता त्याने एके दिवशी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली महाराज आमच्या इस्टेटीतील निम्मा हिस्सा मला मिळाल्यास त्यातील एक चतुर्थांश श्री समर्थ चरणी अर्पण करीन असा नवस करुन तो त्याच्या गावी निघून गेला पुढे त्याच्या म्हणण्याप्रमाणे श्री स्वामी समर्थकृपेने निम्मा हिस्सा त्यास मिळाला परंतु श्री स्वामींस केलेल्या नवसाचा मात्र त्यास विसर पडला अनेकांनी त्यास नवस फेडण्याबाबत सांगितले परंतु त्याने धनलोभाने कुणाचेही ऐकले नाही धनलोभाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती पुढे त्याने शत्रूच्या भीतीने बहुतेक द्रव्य जमिनीत पुरुन ठेविले काही दिवसांनी तो पुरलेले द्रव्य बघण्यास गेला तर त्याचे कोळसे झालेले पासून तो अतिशय दुःखी झाला अक्कलकोटी येऊन श्री स्वामी समर्थांस त्याने घडलेली हकिकत सांगितली त्यावर श्री स्वामी समर्थ हसून त्यास म्हणाले अरे देवाने तुला मनासारखे जे धन दिले ते त्या देवाने नेले आता काही उपाय चालणार नाही जसे आमचे भजन तसेच फळ ना चालता हो आपल्या घरी श्री स्वामींचे हे वचन ऐकून तो खिन्न झाला आणि आपल्या गावी निघून गेला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

या लीलेतील सावत्र भावास श्री स्वामी समर्थांनी त्याच्या मनासारख्या इस्टेटीचा निम्मा हिस्सा दिला त्याची मनोकामना पूर्ण केली परंतु श्री स्वामींस केलेल्या नवसाचा दिलेल्या वचनाचा त्यास विसर पडला पण श्री स्वामी समर्थांना विसर कसा पडेल अप्पलपोट्या हव्यासापायी त्यास विसर पडला त्याने वचनभंग केला ज्याच्या कृपेने त्याची मनोकामना पूर्ण झाली त्यांनाच तो विसरला देव जे देतो ते तो नेऊ शकतो या विचारसूत्राचा त्यास विसर पडला परिणामी त्याच्या हाती अखेरीस कोळसेच लागले या सावत्र भावासारखे असंख्य लोक आजही आजूबाजूस आहेत आपल्याच स्वकार्यकत्तृत्वाने सर्व मिळाले मिळत आहे या अहंभावाने ते वावरतात परंतु हे अर्धसत्य असते त्यात जेव्हा परमेश्वराच्या सामथ्याविषयीचा आणि कृपेचा कृतज्ञभाव असतो तेव्हाच ते पूर्ण सत्य असते तेव्हाच प्राप्त लक्ष्मी लाभदायी सुखकारक आणि आनंद निर्माण करणारी असते आपल्या मानवजातीस मर्यादा आणि अपुरेपण आहे याचा विसर कदापि पडता कामा नये आपण आपण पेरतो तेच उगवते जे कर्म करतो तसेच फळ मिळते हा निसर्गनियम विसरून कसे चालेल ,

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या