त्या वेळच्या पुणे प्रांतातील जुन्नर गावात सखू नावाची एक शूद्र जातीची स्त्री होती तिला कुष्ठरोग झाला होता पुष्कळ उपाय करुनही गुण काही आला नाही एके दिवशी चरणदास नावाच्या भिक्षेसाठी आलेल्या साधूला तिने कुष्ठरोगाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले माये अक्कलकोटास महात्मे श्री सदगुरु महासमर्थ आहेत त्यांचे दर्शन जर घेशील तर तुझा रोग जाईल जा माये उशीर करु नकोस साधूच्या या भाषणाने सखूला आनंद झाला मग मुलीला बरोबर घेऊन ती अक्कलकोटला आली खंडोबाच्या देवळात बसलेल्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्यापुढे हात जोडून ती उभी राहिली तोच महाराज म्हणू लागले बाई सखे दुःख भोगतेस पर्वता सारखे चरणदासाने सांगितल्यावरुन येथे आलीस बरे हा पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगास उगाळून लावीत जा असे म्हणून त्यांनी तिला पांढरा दगड दिला एक महिनाभर ती श्री स्वामी सेवेत राहिली माधुकरी मागून खाणे वारंवार श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांनी दिलेला पांढरा दगड उगाळून अंगास लावणे असा तिचा नित्यक्रम एक महिना सुरू होता एक महिन्यात तिचा कुष्ठरोग निःशेष बरा झाला तिचे शरीर दिव्य झाले मग ती आपल्या गावी गेली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

जुन्नरची सखू ही कुष्ठरोगाने पीडीत असलेली शूद्र स्त्री आहे चरणदास साधूने सांगितल्यावरुन ती अक्कलकोटला आली येथे येईपर्यंत ती कुष्ठरोग सहन करीत होती परंतु तिचे प्रारब्ध थोर असल्यामुळे चरणदास साधूचे निमित्त होऊन ती अक्कलकोटला आली अक्कलकोटला श्री स्वामींचे दर्शन घेताच सर्वसाक्षी व अंर्तज्ञानी श्री स्वामींनी तिच्या आणि साधूच्या नावासह कुष्ठरोगाचे दुःख किती भयंकर पर्वताइतके असते याची तिला जाणीव करुन दिली तेवढ्यावरच न थांबता पांढरा दगड उगाळून कुष्ठरोगावर लावण्यास सांगितले सद्यःस्थितीत पांढरा दगड उगाळून कुष्ठरोगावर लावण्याचा हा उपचार विचित्र वाटेल परंतु श्री स्वामींसारख्या दैवी विभुतीच्या तोंडून बाहेर पडलेला व त्यांचा हस्तस्पर्श झालेला तो दगड होता ती स्त्री जातीने शूद्र तशात तिला कुष्ठरोग झाल्यामुळे उपेक्षित अशा स्त्रीला तो उपचार करताच एक महिन्यात तिचा कुष्ठरोगही गेला तिची कांती दिव्य झाली तिची समाजातील उपेक्षा संपली सद्यःस्थितीत कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींनी यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावेत व त्यास श्री स्वामी समर्थ उपासनेची जोड द्यावी गुण आल्यावर डॉक्टरांना श्रेय द्यावे श्री स्वामींना श्रेयाची अपेक्षा नाही तिला पांढरा दगड उगाळून लाव हे औषध काय दर्शविते सर्वांचाच उद्धार सामाजिक अभिसरण श्री स्वामींना त्याही काळात अभिप्रेत होते हा या लीला कथेचा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या