एके दिवशी श्री स्वामी समर्थ सुमारे २०० सेवेकर्यांसह फिरत फिरत मैंदर्गीस आले गावाबाहेर नाथांच्या मठात तीन दिवस मुक्काम होता सहज कुणासही उतरता येईल अशी एक विहिर जवळच होती परंतु तिसऱ्या दिवशी त्या विहिरीचे पाणी इतके नासले की ते तोंडात घालवेना त्यामुळे सर्व सेवेकर्यांना श्री स्वामी समर्थांनी तेथून मुक्काम हलवला तर अधिक बरे होईल असे वाटत होते मुख्य मंडळींनी श्री स्वामींस दुसरीकडे नेण्याचे नाना प्रयत्न केले परंतु ते तेथून उठेना तेव्हा सर्वांनाच पाणी मिळण्याबाबत काळजी वाटू लागली अनेकांना कोस कोस दूर जाऊन स्नान करुन यावे लागे सेवेकर्यांचे पाण्यावाचून होत असलेले हाल पाहून दयाघन श्री स्वामी समर्थ पलंगावरुन उठले त्यांनी हातात अडीच हात लांबीची काठी घेऊन ती विहिरीत घातली आणि आपल्या नाकास लावली दुसऱ्यांदा ती काठी विहिरीत घालून जवळच असलेल्या लहान वडाच्या झाडास लावली आणि ते तेथून चालते झाले एक गृहस्थ त्या विहिरीच्या पाण्याची चूळ भरुन आला आणि लोकांस सांगू लागला की पाणी उत्तम झाले वास अगदी येत नाही ते ऐकून एक दोन आसामी जाऊन पाहतात तो खरेच पाणी चांगले झालेले मग सर्वांनीच श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जयजयकार करुन स्वयंपाक केला श्री स्वामींस नैवेद्य दाखवून सर्वजणांनी भोजन केले सायंकाळी श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकर्यांसह मोठ्या थाटाने अक्कलकोटास परत आली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
सध्याच्या वाचकास अशक्य भाकड अविश्वसनीय वाटावी अशी ही लीला आहे परंतु योग सामर्थ्य आणि दैवी शक्तीच्या बळावर श्री स्वामी समर्थांकडूनही लीला घडून आली अशक्यही शक्य करती श्री स्वामी याची प्रचिती आणून देणारी लीला आहे अडीच हात लांबीची काठी विहिरीतील पाणी तीस हात खोल त्या पाण्यापर्यंत ती काठी पोहोचली कशी त्या पाण्याच्या वास गेला कसा हे कुणासही अतर्क्य वाटावे असेच आहे परंतु हे घडले मात्र खरे याबाबत श्री स्वामी चरित्रकार पंडित मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांनी लिहिलेल्या श्री स्वामी चरित्रात म्हणतात समर्थांच्या अतर्क्य वाटणाऱ्या असंभाव्य दिसणाऱ्या आणि म्हणून बुद्धीचे समाधान न करणाऱ्या अशा ज्या ज्या घटना आपणास वाटतील त्या त्या घटनांमागे नियत असा कार्यकारणभाव आहेच आहे एवढेच जिज्ञासू वाचकांच्या लक्षात यावे (पृ.२६३ आवृत्ती १९९७) या लीलेतून श्री स्वामी समर्थांच्या अफाट योग सामर्थ्याचा आणि दैवी शक्तीचा बोध होतो ते दयाघन असल्यामुळेच त्यांच्या २०० सेवेकर्यांना वार्यावर न सोडता विहिरीचे पाणी ते पिण्यालायक चांगले करतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रिती या संत तुकारामांच्या अभंग उक्तीप्रमाणे त्यांचा आचार विचार धर्म व तत्त्वज्ञान असल्याचा बोध होतो.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या