अक्कलकोटच्या श्रीराम मंदिरात बाबा सबनीस दररोज वेदान्त चर्चा करीत श्रवणास केव्हा केव्हा श्री स्वामी समर्थ महाराजही येऊन बसत एक दिवस वाटकरी काशिनाथ म्हसवडे बाबा फडणीस वगैरे मंडळी म्हणू लागली की हे स्वामी वेडे आहेत लोक उगीच त्यांच्या नादी लागले आहेत चतुर्थाश्रम घेऊन हे भ्रष्ट झाले आहेत नादाने बाबा सबनीस सुध्दा पोथ्या उलथ्यापालथ्या करीत बसले आहेत श्री स्वामी समर्थांची त्यांच्या अपरोक्ष अशी अकारण निंदा करीत असताना इतक्यात त्यांच्यातील एका गृहस्थाच्या पायास सर्प चावला सर्वच घाबरले सर्वांच्या आग्रहाखातर सर्प चावलेल्या गृहस्थास काशिनाथ म्हसवडकराने श्री स्वामी समर्थांपुढे ठेवले त्यास पाहून श्री स्वामी समर्थ कडाडले आम्ही वेडे भ्रष्ट झालो तरी तुमच्या बापाचे काय गेले बसून भोजन मिळते म्हणून चेष्टा आठवल्या वाटते तुमच्यातले सर्प घोटाळे मला ठाऊक आहेत तुमचे टिळे माळा सोवळे ओवळे अंतर्बाह्य विटाळलेले आहेत काशिनाथ म्हसवडकर आणि बाबा फडणीस यांना त्यांनी श्री स्वामींची त्यांच्या आपरोक्ष केलेली निंदा आठवली श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाची पुरेपूर कल्पना त्यांना आली त्या दोघांना मरणप्राय दुःख झाले श्री स्वामींस विनयाने नमस्कार करुन प्रार्थना करु लागले की महाराज आम्ही अनंत आपराधी आहोत आम्ही अज्ञानपणे आपली अकारण निंदा केली त्याचे प्रायश्चित मिळाले ते श्री स्वामींस शरण गेले श्री स्वामींनी सर्प चावलेल्या गृहस्थाकडे कृपादृष्टीने पाहताच तो खाडकन उठून बसला पुढे म्हसवडकर बाबा फडणीस आणि सर्प चावलेला गृहस्थ हे तिघेही श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त बनले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

म्हसवडकर फडणीसासारखी मंडळी तेव्हाही समाजात होती व आताही आहेत स्वतःचा शोध न घेता स्वतःचे आत्मपरीक्षण न करता आणि स्वतःखाली असलेला अंधार न बघता इतरांवर त्यातही संत सज्जनांवर त्यांच्या अपरोक्ष अकारण टीका करण्याची काहींना खोड असते तशी ती या मंडळीसही होती परंतु श्री स्वामी समर्थ हे निःस्पृह आणि निर्भीड होते त्यांच्या अंतःसाक्षित्वाच्या सामर्थ्यामुळे भले भले त्यांच्या पुढे येण्यास घाबरत विशेषत निंदक भ्रष्ट नतद्रष्ट आणि व्याभिचारी लोकांची त्यांच्यापुढे गाळण उडत आसे ते अशी काही लीला करायचे की कुणाही कुटिलास ठिकाणावरच यावे लागे जसे की या कथेत एका गृहस्थास सर्प चावण्याचे निमित्त होऊन स्वतःची कानउघाडणी करुन घेण्याची वेळ म्हसवडकर आणि फडणीसांवर आलीच ना या लीलेत श्री स्वामींनी सर्प चावलेल्या गृहस्थास वाचवले स्वतःचे दैवी सामर्थ्य कारुण्य दयाभाव त्यांनी दाखवून दिला कुणाचीही अकारण अपरोक्ष निंदा करणे किती वाईट असते त्याचे फलित काय मिळते तेव्हा आपण कुणाचीही अकारण निंदा करावी का त्यातून काय साध्य होते उलट आपणासच मनस्ताप होतो तेव्हा आपण सर्वांनी हा अर्थबोध घ्यावा (आद्य श्री शंकराचार्यांनी जिव्हा प्रार्थना नावाचे छोटे स्तोत्र लिहिले आहे ते सर्वांनी तोंडपाठ करावे).

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या