अक्कलकोटात चोळाप्पाच्या घरी श्री स्वामी समर्थांसारखे प्रत्यक्ष परब्रम्ह वास्तव्यास आल्यामुळे परशुराम सेवेकर्याने काशीस जाण्याचा बेत रद्द केला पण चोळाप्पाचे तीर्थयात्रेस जाणे पीरास नवस बोलणे शेरणी वाटणे चुकले नव्हते असेच एकदा चोळाप्पा कुटुंबीयांसह तुळजापूरच्या कुलदेवतेच्या यात्रेस निघाला बाळाप्पालाही बरोबर येण्याचा त्याने आग्रह केला पण बाळाप्पाने चोळाप्पास श्री स्वामी महाराजांची यात्रेला जाण्याची आज्ञा घ्यावयास सांगितले श्री स्वामींनी जाण्याची आज्ञा दिल्यास आपण यात्रेस येऊ असे बाळाप्पाने चोळाप्पास सांगितले बाळाप्पाचा हात धरुन चोळाप्पा श्री स्वामींकडे तुळजापूरला जाण्याविषयी आज्ञा मागू लागला तेव्हा श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले डोंगरावर चढून उकरण्यास जा हे ऐकून श्री स्वामींची सेवा सोडून तुळजापूरास जाण्यात काहीच अर्थ नाही असे समजून बाळाप्पा गेला नाही चोळाप्पा मात्र गेला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थ हे चोळाप्पाच्या घरी प्रत्यक्ष वास्तव्यास होते चोळाप्पा परम भाग्यशाली होता श्री स्वामी चोळाप्पाबाबत म्हणत.

जैसे असावे पुत्र -पिता ! तैसे आम्ही जन्म साता !!
जीवींचा जीव हा तत्त्वता ! चोळ्या माझा !! (श्री स्वामी समर्थ )

म्हणूनच अक्कलकोटात आल्याबरोबर त्यांचा मुक्काम चोळाप्पाच्याच घरी होता असा हा चोळाप्पा परमभाग्यशाली होता परंतु त्याची अटळ नियती टळली नाही त्याला प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामींचा निकटचा सहवास होता परंतु तो मोह माया स्वार्थ यात पूर्ण गुरफटला होता परिणामी जीवन जगण्याचा उद्देश आणि मूल्यंच तो हरवून बसला टाकाऊ आणि टिकाऊ अल्पजीवी आणि चिरंजीवी याचा त्याला विसर पडला तो श्री स्वामींचा आवडता आणि संबंधित असूनही त्यांची आज्ञा नसताना तीर्थयात्रेस का गेला असे का घडले आष्टौप्रहर देवाच्या सान्निध्यात ध्यान धारणा पूजाअर्चा करणाऱ्यांची अपत्येच जेव्हा वाईट वळणावरची चालीची निघाल्याचे आपण पाहतो वाचतो ऐकतो तेव्हा हा कसला परिणाम उत्तरे व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न आहेत पण ती ठाम आणि निश्चित नाहीत मात्र यातून एक बोध घ्यावयास हवा मनोभावे एकाच परमेश्वराची पूजा साधना उपासना केल्यावर अन्यत्र भटकण्याची भरकटण्याची काय आवश्यकता या लीलेत बाळाप्पांचाही उल्लेख आला आहे श्री स्वामींनी परवानगी दिल्यासच आपण येऊ असे बाळाप्पा म्हणतो येथे बाळाप्पासुध्दा श्री स्वामींशिवाय अन्य दुसरे काही नाही असे चोळाप्पास ठामपणे आत्मविश्वासाने सांगू शकला नाही याचा अर्थ तेव्हा बाळाप्पाही पूर्णपणे श्री स्वामीलिप्त झाला नव्हता श्री स्वानिष्ठेत स्वतःचे अस्तित्व विसरला नव्हता काही वेळा तुम्हा आम्हाला प्रसंगानुरुप कधी अपरिहार्य अन्य देव देवतास जावे लागते त्याचे दर्शनही घ्यावे लागते पण त्यात श्री स्वामी समर्थच आहेत असे कल्पून दर्शन घेणे तसेच वागणे हेच उचित अटळ आणि निस्सीम निष्ठा हीच अंतिमत फलदायी ठरते हनुमानाची जशी प्रभूरामचंद्रांवर अर्जुनाची आणि मीरेची जशी श्रीकृष्णावर होती संत तुकारामांची जशी पांडुरंगावर निष्ठा होती तशी निष्ठा असावयास हवीअन्यथा श्री स्वामी समर्थांनी सुनावल्याप्रमाणे डोंगर चढून उकिरडे फुंकित फिरण्यासारखे आहे असे आपण करावयाचे की नाही ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या