कर्नाटकातील हावेरी गावचे बाळाप्पा म्हणून एक सेवेकरी ते मूळचे सुखवस्तू भरपूर शेतीवाडी जोडीला सराफी म्हणजे कर्जाऊ पैसे देण्याचा व्यवसाय होता पण गुरुदर्शनाच्या ओढीने त्यांनी वयाच्या अवघ्या तिशीत भरला संसार सोडून ते घराबाहेर पडले आणि गाणगापूरला येऊन गुरुदर्शन व्हावे म्हणून फार कडक सेवा करु लागले तीन महिन्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटला जा त्यांनी अक्कलकोटची कीर्ती अगोदर ऐकलेली होतीच ते अक्कलकोटला आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ खासबागेत होते श्री स्वामी समर्थांपुढे खडीसाखर ठेवून बाळाप्पाने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले श्री स्वामींची मूर्ती पाहताच स्वप्नात ज्या संन्याशाने दर्शन दिले होते तीच ही मूर्ती असे पाहून बाळाप्पास आनंद झाला ते श्री स्वामींची सेवा मुरलीधराचे देवळात राहून करु लागले सुंदराबाईने बाळाप्पास प्रथम आश्रय दिला तिच्या मार्फत बाळाप्पा श्री स्वामींची सेवा करु लागल्यामुळे चोळाप्पाच्या मनात बाळाप्पाविषयी द्वेष निर्माण झाला बाळाप्पाने तेथे राहू नये असे चोळाप्पास वाटू लागले म्हणून एक दिवस चोळाप्पा श्री स्वामी महाराजांना म्हणू लागला की महाराज बाळाप्पास त्याच्या घरुन येथे येऊन बरेच दिवस झाले आहेत त्याला आपल्या कुलदेवतेस व बायको मुलास भेटावेसे वाटते हे ऐकून श्री स्वामी म्हणाले नाही रे त्याची बायकोमुले येथेच आहेत चिठ्ठया टाकून निर्णय घ्यावा अशी श्रीपाद भटाने त्यावर शक्कल लढविली त्याप्रमाणे चिठ्ठया टाकल्या परंतु सर्व सत्ताधीश राजाधिराज श्री स्वामी समर्थ असताना जाऊ नको अशी चिठ्ठी आली त्यामुळे चोळाप्पा आणि श्रीपाद भटाचा निरुपाय झाला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
ह्या लीला भागात बाळाप्पा सुंदराबाई आणि श्रीपाद भट ही पात्रे आहेत त्यावेळच्या आणि आताच्या काल मान परिस्थिती यात जरी बदल झालेला असला तरी व्यक्तींच्या मूळ प्रवृत्ती स्वभाव धर्म आणि आचार विचार पध्दतीत फारसा बदल झालेला नाही बाळाप्पा सौम्य स्वभावाचा आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा दिसतो गाणगापुरचे दत्तप्रभू आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ एकच असल्याचा बोधही बाळाप्पास स्पष्ट होतो कारण गाणगापुरातील दत्तप्रभूंच्या त्याच्या तीन महिन्याच्या खडतर आणि कठोर सेवेतून बाळाप्पास अक्कलकोटला जाण्याचा स्वप्न दृष्टांत झाला स्वप्नदृष्टांतातील संन्याशी आणि प्रत्यक्ष अक्कलकोटात पाहिलेले श्री स्वामी समर्थ त्यास तंतोतंत सारखे वाटले यावरुन त्या दोन्ही दैवतांच्या एकरुपतेचे साक्षित्व त्यास पटते या लीलेत सुंदराबाई सौम्यच वाटते श्री स्वामींच्या सदैव सहवासात आणि सेवेत असलेल्या चोळाप्पाचा मत्सरीपणा दिसतो मी एकटाच काय तो श्री स्वामी समर्थांचा सेवेकरी ही त्याची अहंताही येथे दिसते तो बाळाप्पास बायकामुलास भेटावयास जाण्याचे सुचवितो त्यासाठी तो आणि श्रीपाद भट चिठ्ठया टाकण्याची शक्कल श्री स्वामींपुढे लढवतात श्री स्वामी सारख्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभूनही त्यांचे आकलन समज आणि ज्ञान किती कोते कमकुवत होते याची कल्पना येते जाऊ नको म्हणून आलेला चिठ्ठीतील संदेश श्री स्वामींचे दैवी सामर्थ्य अधोरेखित करतो नाही रे त्याची बायको मुले येथेच आहेत हे श्री स्वामींचे या लीलेतील उत्तर मोठे मार्मिक व अर्थपूर्ण आहे पण ते त्या दोघांना उमगले नाही बाळाप्पास श्री स्वामी हे त्याचे सार सर्वस्व वाटत होते हे अंतःसाक्षी श्री स्वामींनी मनोमन ताडले होते म्हणूनच त्यांनी नाही रे त्याची बायको मुले येथेच आहेत असे ठाम उदगार काढले याचा स्पष्ट अर्थ असा की ज्याच्या प्रेमशक्तीनेच घर बायको मुला मुलींबद्दल प्रेम वाटते ती प्रेमशक्ती म्हणजे साक्षात सदगुरु श्री स्वामी समर्थच असल्याने बाळाप्पास घरी जाण्याची आवश्यकताच नाही आजही आपण साधू संत सज्जनांच्या संगतीत वावरत असतो पण राग लोभ मोह मत्सर आदी विसरतो का घर दार बायको मुले बाळे कुटुंब कबिला प्रपंच उद्योग व्यवसाय इ.विसरतो का नाही या लीलाभागातून श्री स्वामींना हेच सांगावयाचे आहे की भक्ती उपासना करताना त्यात षडरिपू राजकारण शह काटशह कारस्थान आणि असूया यास स्थान असू नये जसे या लीला भागात चोळाप्पा व श्रीपाद भटात होते.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या