सोलापूरचा एक रेल्वेतील युरोपियन अधिकारी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यास संतती व्हावी म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन संतान हवे असे मनोमन चिंतन करीत श्री स्वामींच्या पुढे उभा राहिला त्याच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी म्हणाले क्या तेरेकू बेटा होना हो जाएगा एक बरस दिन आपल्या मनातील हेतू ओळखून श्री स्वामींनी आपल्यास आशीर्वाद दिला याचे त्या युरोपियन अधिकाऱ्यास मोठे आश्चर्य वाटले आणि त्यास आनंदही झाला पुढे एका वर्षाचे आतच त्याला मुलगा झाला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने अनेकांना पुत्रसंतान प्राप्त झाल्याच्या नवलकथा रेल्वेतील त्या युरोपियन अधिकाऱ्याने ऐकल्या होत्या त्यामुळे त्याला श्री स्वामी समर्थांबद्दल प्रचंड कुतूहल तर होतेच शिवाय पुत्रप्राप्तीचा कृपाशीर्वाद मिळावा हा अंतःस्थ हेतूही होता म्हणून तो श्री स्वामी दर्शनास अक्कलकोटला आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन तो उभा राहताच श्री स्वामींनी त्याच्या मनातला अंतःस्थ हेतू जाणला क्या तेरेकू बेटा होना हो जावेगा एक बरस दिन असा कृपाशीर्वादही देऊन टाकला या लीलेत त्या युरोपियन अधिकाऱ्याच्या मनातील श्रध्देला श्री स्वामी समर्थांसारख्या अलौकिक दैवी दर्शनाने धुमारा फुटला त्यांच्यातला उरला सुरला प्रापंचिकजडवाद नाहीसा झाला श्री स्वामींनी त्याच्या मनातील पुत्रसंतान प्राप्तीचा हेतू ओळखून त्याला तसा कृपाशीर्वाद मिळाल्यामुळे त्याची श्री स्वामी समर्थांवरील श्रध्दा अधिकच दृढ झाली वर्षभरातच त्याच्या श्रध्देला फळ येऊन त्याला पुत्र झाला त्यादृष्टीने त्याचा श्री स्वामींनी एक प्रकारे उध्दारच केला व दिलेल्या कृपाशीर्वादाचा त्यास प्रत्यय दिला पुढे त्याची श्री स्वामींवरील श्रध्दा इतकी वाढीस लागली की तो स्वतः सहकुटुंब श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला पुन्हा पुन्हा अक्कलकोटला येत राहिला शिवाय त्याने अनेक युरोपियनांना श्री स्वामी समर्थांचा दैवी महिमा सांगितला श्री स्वामी जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत विव्दान अडाणी असा कोणताही भेदभाव न करता कशी कृपा करीत हा प्रमुख बोध या लीलेतून मिळतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या