अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाच्या गृहस्थांच्या घरी कधी कधी श्री स्वामी समर्थ जात असत एके दिवशी ते मोरोबांच्या घरी असताना त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखू लागले तिला वेदना सहन होईनात ती मध्यरात्री जीव देण्याच्या उद्देशाने विहिरीच्या काठावर जाऊन उभी राहिली इतक्यात श्री स्वामींनी जागृत होऊन सेवेकर्यास उठविले व म्हणाले अरे विहिरीत कोण जीव देतो बघा बरं त्यावर सेवेकरी म्हणाले एवढया रात्री कोण आपला जीव देतो आहे आपण स्वस्थ निजावे तेव्हा श्री स्वामी सेवेकर्यांना म्हणाले तुम्ही अरण्य पंडित आहा आम्ही खरे सांगितले असून मानीत नाही मूर्खांनो मग सेवेकरी उठून विहिरीवर गेले तो मोरोबांची पत्नी उडी टाकण्याच्या बेतात असतानाच सेवेकर्यांनी तिचा हात धरुन वाचवले आणि तिला घेऊन श्री स्वामींकडे आले मोरोबाही आला श्री स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज आज माझ्यावरील संकट आपण निवारण केलेत असाच आपल्या दासाचा सांभाळ करावा पुढे मोरोबांच्या पत्नीचे पोटही श्री स्वामी कृपेने बरे झाले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

या लीलेवरुन श्री स्वामी समर्थांच्या अंतरसाक्षित्वाची स्पष्ट कल्पना येते कारण मध्यरात्रीच्या वेळी विहिरीत जीव देण्यास गेलेल्या मोरोबांच्या पत्नीस त्यांनी सेवेकर्यांना पाठवून वाचविले अळंटळं करणाऱ्या सेवेकर्यांना श्री स्वामी तुम्ही अरण्यपंडित आहा असे म्हणून खडसावतात अरण्यपंडित म्हणजे रानावनात निर्जन ठिकाणी वायफळ पांडित्य दाखविणारे श्री स्वामींच्या अवतार काळात काही सेवेकरी असेच अरण्यपंडित होते परंतु श्री स्वामी समर्थ हे साक्षात परब्रम्ह परमेश्वरच सूक्ष्मातली सूक्ष्म घटनास्पंदने जाणणारे खर्या खुर्या सत्याचे आकलन करुन घेणारे होते म्हणूनच मोरोबाची पत्नी जीव देण्यास विहिरीकडे गेल्याचे सत्य त्यांना मध्यरात्रीही ज्ञात झाले संसार प्रपंच करताना अनेक दुःखे व्याधी पीडा यांना सामोरे जावे लागते त्यावर उपायही करावे लागतात परंतु अशाही परिस्थितीत परमेश्वराचे अनुसंधान कधीही सुटता उपयोगी नाही प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी घरी आलेले असताना वासनालिप्त मोरोबांच्या पत्नीला त्याचे कोणतेही अर्पूप वाटले नाही वास्तविक श्री स्वामी हे सर्वच व्याधी पीडा दुःख विसरावयास लावणारे सामर्थ्यशाली अवतारी भगवंत परंतु विवेकशून्य आणि वासनालिप्त त्या पत्नीला यातनांनी असे काही त्रस्त केले होते की ती स्वतःचा जीवच संपविण्यास निघाली होती परंतु दयाघन श्री स्वामींनी तिला वाचविले जीवदान दिले संसारतापाने तप्त असलेल्यांनी या लीलेचे मनन चिंतन करावे परब्रम्ह श्री स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवावा .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या