अक्कलकोट पासून २० कोसावरील लोहगावच्या बापू कुलकर्णी यास कंठछिद्र पडले त्यातून अन्नपाणी बाहेर पडत असे पुष्कळ औषधोपचार केले पण गुण येईना त्रासून ते गाणगापुरास आले त्यांनी ब्राम्हाणांकडून गुरुचरित्राचे पारायण करुन ते ऐकले सातव्या दिवशी त्यांना पार्थिव गणपतीची पूजा करा असा दृष्टांत झाला दृष्टांतानुसार ते पार्थिव गणपतीची पूजा करीत असता मागून त्यांच्या अंगावर एक भुजंग चढू लागला तो त्यांनी पाहताच ते घाबरले त्यांच्या हातातील पार्थिव गणपती खाली पडताच तो भुजंग पळाला त्या दिवसापासून त्यांच्या कंठास आराम पडू लागला पुढे त्यांना हरिगुण वर्णन करा असा दृष्टांत झाला जागे होऊन ते विचार करु लागले की मला विद्याही नाही व कोणत्याही तर्हेचा माझा अभ्यास नाही तर कवित्व कसे करता येईल परंतु आज्ञा झाल्याप्रमाणे सुरूवात केली पाहिजे असे म्हणून त्यांनी तीन चारशे अभंग केले परंतु प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण पूर्ण होईना त्यांनी दत्तप्रभूस पुन्हा प्रार्थना करताच त्यांना दृष्टांत झाला मी अक्कलकोटी अवतार घेतला आहे तर त्या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थांना शरण जा म्हणजे कार्य होईल म्हणून दुसरे दिवशी ते अक्कलकोटला आले श्री स्वामींस साष्टांग नमस्कार करुन उभे राहताच श्री स्वामींनी त्यांच्या कंठास पायाचा अंगठा लावला व मस्तकी हात ठेवला त्याबरोबर कंठ छिद्र निःशेष बरे होऊन त्यांना ज्ञानप्रकाश झाला नंतर त्यांनी अभंगाचे शेवटचे (चौथे) चरण लिहून अभंग पूर्ण केले पुढे ते दास बापू या नावाने प्रसिद्धीस येऊन संत पदवीस पोहोचले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेत लोहगावच्या बापूराव कुलकर्ण्यास कंठछिद्राचा अतोनात त्रास होत होता आतासारखे तेव्हा वैद्यकीय शास्त्र प्रगल्भ आणि प्रगत नव्हते रोग पीडा दुःख निवारण्यासाठी पूजा अर्चा अनुष्ठाने पारायणे इ. केली जात त्यामुळे त्यांनी तेव्हा गाणगापुरात गुरुचरित्राच्या पारायणाचे श्रवण केले स्वप्नदृष्टांतानुसार ते पार्थिव गणपतीची पूजा करु लागले एकदा भुजंग त्यांच्या अंगावर चढल्यामुळे त्यांच्या हातून पार्थिव गणपती खाली पडला परंतु त्या दिवसापासून त्यांच्या कंठास थोडा थोडा आराम पडू लागला हरिगुण वर्णन करण्याची दृष्टांतात त्यांना आज्ञा झाली त्यांनी तीनचारशे अभंग रचना केली या लीलेत त्यांच्या बाबत दोन गोष्टी प्रामुख्याने दिल्या आहेत एक त्यांचे कंठछिद्र पूर्णपणे बरे झाले नव्हते दुसरे त्यांच्या अभंगाचे चौथे चरण त्यांना न सुचल्यामुळे ते सर्व अभंग अपुरेच होते त्यांना अक्कलकोटी येण्याची आणि दत्तप्रभू तेथे श्री स्वामी समर्थ रुपाने कार्यरत असल्याची दृष्टांतात सूचना मिळाल्यामुळे ते अक्कलकोटी आले येथे येताच त्यांचे कंठछिद्र पूर्णपणे बरे झाले आणि ज्ञानप्रकाश प्राप्त होऊन अभंगाचे राहिलेले चौथे चरणही ते पूर्ण करु शकले या लीला कथेच्या मथितार्थात बापू कुलकर्ण्यास कंठछिद्राच्या असह्य वेदनेने देवाची तीव्रतेने आठवण कशी करुन दिली आणि अखेरीस ते अक्कलकोटला येऊन पूर्ण बरे आणि ज्ञानी कसे झाले याचे वर्णन आले आहे बापू कुलकर्ण्याचा अभ्यास नसतानाही त्यांनी तीन चारशे अभंग रचले परमेश्वरच प्रेरणा देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेत होता पण कंठछिद्राच्या राहिलेल्या वेदनांची कसर आणि अभंगाचे अपुरेपण बाकी होतेच अक्कलकोटला येऊन श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या कंठछिद्राची शारीरिक व्याधी आणि प्रपंचातील आसक्तीची मानसिक व्याधी पूर्णपणे बरी झाली धर्म अर्थ काम असे तीन चरण अगोदर रचले होते पण श्री स्वामींच्या कृपेने मोक्षमुक्तीचा अंतिम चौथा चरणही रचला गेला गुरुकृपा ही काय आणि कशी असते त्याचा वृत्तांत देणारी ही लीला आहे हेच बापू कुलकर्णी पुढे दासबापू म्हणून संतपदी पोहोचले श्री स्वामी कृपेची जेथे जाणीव तेथे कसली उणीव हेच खरे मी अक्कलकोटी अवतार घेतला आहे तर त्या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थांना शरण जा म्हणजे कार्य होईल या दृष्टांत सूचनेवरुन श्री स्वामी समर्थ हे दत्त प्रभूंचे अवतार होते दत्त प्रभूच श्री स्वामी समर्थांच्या अवताराद्वारा कार्य करीत होते हे स्पष्ट होते म्हणजे दत्तप्रभू आणि श्री स्वामी समर्थांमध्ये कोणतेही द्वैत नव्हते सद्यःस्थितीत एखाद्यास बापूराव कुलकर्ण्यासारखा आजार झाला तर अत्याधुनिक वैद्यकीय उपचारही करावे लागतील आणि श्री स्वामी समर्थांची योग्य ती उपासना ही करावी लागेल विज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय साधावा लागेल तेच कालमान परत्वे सुसंगत ठरेल विवेकहिन भोळे भाबडे धर्माचे वा आध्यात्माचे अंधानुकरण आणि संवेदना हिन शुष्क विज्ञानही उपयोगाचे ठरणार नाही हाच बोध सध्यातरी यातून घ्यावयास हवा.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या