काही छळक (दुष्ट) मंडळींनी मद्य मांसाची पात्रे भरुन श्री स्वामी महाराजांपुढे ठेवून त्यांना खाण्याचा आग्रह करु लागले इतक्यात एक बाई तेथे येऊन श्री स्वामींकडे निर्देश करुन लोकांस सांगू लागली की हे पूर्ण ब्रह्य परमहंस परमात्मा विश्वेश्वर आहेत यांचा छळ केल्यास तुमचा सर्वस्वी नाश होईल हस्तस्पर्श करताच मांसाची फळे व मद्याचे पाणी झाले लोकांना आश्चर्य वाटले श्रीपाद भटाने श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून विचारले महाराज आपण अक्कलकोटाहून केव्हा आलात श्री स्वामी म्हणाले आमचा वास सर्वत्र आहे परंतु तुझ्या कर्माकरिता आलो आज तू विद्वान मंडळीत जाऊन वेदांचे मंत्र म्हण श्री स्वामी समर्थांची आज्ञा शिरसांवद्य मानून श्रीपाद भट काशीच्या वैदिकात जाऊन बसले ते काशीकर विद्वानांच्या चुका काढू लागले श्री स्वामी चरणांचे स्मरण करुन ते वेदमंत्र म्हणू लागले काशीचे विद्वान चकित झाले त्यांनी श्रीपाद भटजीचा हात धरुन त्यांना मोठया सन्मानाने आसनावर आणून बसविले व ते म्हणू लागले महाराज (श्रीपाद भटजीस) आतापर्यंत आपली योग्यता आम्ही न ओळखून आपला अपमान केला याची क्षमा असावी असे म्हणून श्रीपाद भटजीस पुष्कळ वस्त्र अलंकार अर्पण केले नंतर श्रीपाद भटजी ब्राम्हण भोजन घालून अक्कलकोटी आले अक्कलकोटी आल्यावर वे.शा.सं.दशगंथी श्रीपाद भटांनी श्री स्वामींची षोडशेपचारे पूजा करुन त्यांची पुष्कळ स्तुती केली आणि ते म्हणू लागले महाराज माझ्यासारखा मूढाच्या मुखाने वेदमंत्र बोलविले आपली लीला अतर्क्य आहे असे म्हणून श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घातला झालेली सर्व हकिकत सर्व सेवेकरी मंडळीस सांगितली सर्वांनाच आश्चर्य वाटले सर्व श्री स्वामी नामाचा जयजयकार करु लागले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथा भागात खल प्रवृत्तीचे लोक कसे वागतात याचेही दर्शन घडविले आहे परंतु मांसाची फळे व मद्याचे पाणी झाले २३ सिद्धी ज्याच्या दासी सदैव सेवेस होत्या त्या श्री स्वामींना अशक्यप्राय ते काय असणार संकल्पसिद्धीने सापाचे हाडाचे मातीचे सोने ते सहज करु शकत त्याच सिद्धीने त्यांनी मांसाची फळे तर मद्याचे पाणी केले आता वे.शा.सं.दशग्रंथी श्रीपाद भटाला श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे अधिष्ठान लाभले त्यामुळे त्यास काशीचे विद्वान वेदमंत्र म्हणत असताना त्यांच्या चुका काढण्याचे बौद्धिक सामर्थ्य प्राप्त झाले इतके दिवस हेच काशीकर विद्वान त्यांची दखलही घेत नव्हते त्यांनीच श्रीपाद भटास उच्चासनावर बसवून त्यांचा सन्मान केला त्यांची क्षमा मागितली श्रीपाद भटाची योग्यता ओळखल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली पण हे सर्व कोणामुळे याची कृतज्ञ जाणीव श्रीपाद भटास होती प्रभूकृपा झाल्यावर काशीच्या विद्वानांकडून मान सन्मान मिळाल्यानंतर श्रीपाद भटाने काशी विश्वेश्वराला पूजा अभिषेक केला आणि ब्राम्हण भोजन घालून अक्कलकोटी श्री स्वामींच्या दर्शनास आला काशीत घडलेल्या सर्व वृत्ताचे श्री स्वामी महाराजांपुढे नम्रभावे निवेदन केले श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा केली महाराज आपली लीला अतर्क्य आहे अगाध आहे आपणास विनम्र भाव आणि कृतज्ञता शिकविणारी ही लीला आहे शिवाय श्री स्वामी समर्थ नम्र सेवेकर्यांवर कशी कृपा करतात याचाही अर्थबोध ह्या लीलाकथेतून तुम्हा आम्हास होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या