एके दिवशी एका कुणब्याचा बैल तुफान उन्मत्त होऊन एका विहिरीवर जाऊन उभा राहिला दहा वीस जणांनाही तो आवरेना सकाळपासून सायंकाळपर्यंत बैल धरण्याचे अक्कलकोटातील लोकांचे सारे प्रयत्न थकले बैल लोकांच्या अंगावर धावे अखेरीस त्या कुणब्याने श्री स्वामी समर्थांस प्रार्थना केली त्यावर श्री स्वामी समर्थ त्या कुणब्यास म्हणाले काय रे तुझा बैल तुला धरु देत नाही कुणबी म्हणाला अंगावर येतो धरु देत नाही मी काय करु मग श्री स्वामी महाराज स्वतः उठले बैलाजवळ जाऊन त्याचा कान धरला शेळीसारखे आणून त्या मस्तवाल बैलास कुणब्याच्या स्वाधीन केला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचे अवघे चरित्र त्यांच्या अनेक विविध लीलांमुळे अदभुतरम्य आणि बोधप्रदही झाले आहे या लीलाकथेत एक साधासुधा कुणबी त्याचा उधळलेला बैल त्याला आवरण्याचा दहा वीस जणांनी केलेला निष्फळ प्रयत्न अखेरीस कुणब्याचे श्री स्वामीस शरण जाणे श्री स्वामींनी काय रे तुझा बैल तुला धरु देत नाही हे आशयगर्भ काढलेले उदगार हे सर्व वरवर अनाकलनीय आहे या लीलेतील मथितार्थ पाहू गेल्यास येथील कुणबी हा एक अज्ञानी प्रापंचिक साधा भोळा जीव आहे कुणाच्याही प्रपंचात अनेकदा मनरुपी बैल उधळत असतो तरुण वय अनेकदा मुजोर मस्ती करत असते ते तेव्हा सहसा कुणाच्याही आटोक्यात येत नाही सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या उधळलेल्या बैलास काबूत आणण्याचे सर्वांचे प्रयत्न थकले याचाच अर्थ तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्यांच्या मनाची व वृत्तीची स्थिती ह्या लीलाकथेतील कुणब्यासारखी अनेकदा झालेली असते सत्ता संपत्ती तारुण्यात एक प्रकारचा उन्माद उच्छादिपणा बेफिकिरी आणि निर्ढावलेली वृत्ती असते (उधळलेल्या बैलासारखी) यातच आयुष्य सरत जाते वृद्धावस्था येते मग आपण कंटाळतो थकतो हरतो हतबल होतो परिस्थितीला शरण येतो तेव्हा या हतबलतेतून परमेश्वरास विनवितो महाराज खवळलेला बैल अंगावर येतो धरु देत नाही मी काय करु श्री स्वामी समर्थास त्याची अगतिकता मानसिक असमर्थता लक्षात येते काय रे तुझा बैल तुला धरु देत नाही म्हणजे काय रे तुझे तुलाच तुझे मन वृत्ती आवरता येत नाही का असेच जणू उपरोधाने विचारुन दयाघन श्री स्वामी त्याच्या मदतीस येतात शरण आलेल्या जीवाच्या अशा उधळलेल्या मनाचा आणि वृत्तीचा उद्धार करुन श्री स्वामी समर्थ तुमच्या माझ्या सारख्याला सांभाळतात त्यासाठी हवे निरंतर श्री स्वामी स्मरण आणि त्यांचे अनन्यभावे चिंतन.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या