शके १७९१ (इ.स.१८६९) च्या मार्गशीर्ष शुक्ल पक्षात श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांसह अक्कलकोट नजीक नागसूर हचनाळ हवरे गावी फिरत असता श्रीगुरुदत्ताचे दर्शन व्हावे म्हणून पुष्कळ वर्षे अनुष्ठान केलेला एक गोसावी फिरत फिरत श्री स्वामी समर्थ होते तेथे आला श्री स्वामी समर्थांचे तेजःपुंज शरीर पाहून तो गोसावी स्तब्ध उभा राहिला श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी त्याने खडतर तपश्चर्या अनुष्ठाने आदि केली होती परंतु दत्तप्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे तो निराश झाला होता त्यासाठी त्याने अनुष्ठान रुपाने खडतर तपश्चर्या केली होती त्याच्या तपश्चर्येचे फळ म्हणून श्री स्वामींनी त्यास दत्तप्रभूचे स्वरुपात दर्शन दिले त्या अनुष्ठानी गोसाव्याने श्री स्वामींना दत्तप्रभूचे स्वरुपात पाहून परमानंद पावत तो म्हणाला आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरुपाची ओळख कशाने ठेवणार असे भगवान आपण साक्षात पूर्णब्रम्ह दत्तात्रेय मला दर्शन दिले माझ्या कर्माचे व जन्माचे सार्थक झाले असे म्हणून श्री स्वामींची आज्ञा घेऊन तो गोसावी त्याच्या गावी गेला .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलेत गोसाव्याने दत्तप्रभूंच्या सगुण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या अनुष्ठाने आदी केले होते पण दर्शन मात्र होत नव्हते मी खडतर तप केले तरी मला दत्तप्रभूंचे दर्शन नाही या त्याच्या वृत्तीतून तपश्चर्येचा त्याच्या मनात अहंभाव शिल्लक होता आपल्यातील अनेक जण त्यांच्यात असलेल्या उपासनेच्या अहंपणाचा टेंभा मिरविताना दिसतात तो का कशासाठी हे त्यांना नीट कळतही नाही उपासक असावे पण उपासनेचे प्रदर्शन टाळावे षडरिपूमुक्त अहंकारविरहित उपासनाच परमेश्वराचे सान्निध्य मिळवून देते परमेश्वराचे स्वरूप अंतरमनात उमटू लागते श्री स्वामी समर्थांचे मागे मागे दत्तप्रभूंच्या दर्शनाच्या अभिलाषेने तो गोसावी एका गावाहून दुसऱ्या गावी फिरत होता त्याचा तपश्चर्येचा अहंभाव क्षीण होत होता तो संपताक्षणी त्यास तेजःपुंज श्री स्वामी समर्थांच्या ठायीच दत्तप्रभूंचे दर्शन झाले निव्वळ भौतिक सुखाच्या लालसेने उपासना करु नये आत्मानंदासाठी उपासना करीत राहिल्यास परमेश्वराचे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दर्शन होते विविध माध्यमातून मदतही मिळते श्री स्वामी समर्थांनी तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नही जिंदा है असे अभिवचन दिले आहे ते सर्वश्रत आहे .
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या