मैंदर्गीच्या एका ब्राम्हणास दोन मुलगे आणि तीन मुली अशी पाच अपत्ये होती ती सर्वच वेडगळ होती पुढे तो ब्राम्हण त्याची पत्नी आणि चार अपत्ये मृत्यू पावली मन्या नावाचा एक मुलगा मात्र जिवंत राहिला तो मुका आणि वेडा होता पंचवीस तीस वर्षे तो मैंदर्गी गावीच होता तो निराधार स्थितीत कोठेही खात असे कोठेही निजत असे आणि कोठेही बसत असे मैंदर्गीची काही मंडळी जेव्हा अक्कलकोटास आली तेव्हा त्यांनी त्यांच्या बरोबर मन्याबासही आणले सर्वांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन्याबास श्री स्वामींच्या पायावर घातले तेव्हा महाराज मन्याबास म्हणाले दिवाना क्या होना रे परंतु महाराज त्याला काय समजते सोबत आलेली मंडळी म्हणाली महाराज त्याचे वेड घालावा असेही ते म्हणाले त्यावर श्री स्वामी महाराज काहीच बोलले नाहीत ती सर्व मंडळी दोन दिवस राहून मैंदर्गीस परत गेली मन्याबा मात्र अक्कलकोटातच सुमारे १५ वर्षे राहिला काही वर्षांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मुका असलेला मन्याबा मराठी आणि कानडी बोलू लागला तो लोकांच्या नवसासही पावू लागल्यामुळे लोक त्याला मान देऊ लागले कोणाचे काम होणार असेल तर तो होईल असे म्हणे होणार नसेल तर नाही रे असे म्हणे जर कोणी त्यास विचारले की होईल असे का म्हणत नाहीस त्यावर तो उत्तर देई की स्वामी मारील स्वामी गांडीचे कातडे काढील स्वामी गांडीचे रक्त काढील श्री स्वामी समर्थ कृपेने त्यास भूत भविष्य कळे तो पुरुषास दादा व स्त्रीला आई म्हणून हाक मारीत असे.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ह्या लीलेत वर्णन केलेल्या मैंदर्गीच्या ब्राम्हणासारखी स्थिती समाजातील काही कुटुंबामध्ये असू शकते कुटुंबातील बायको मुले व मुली मृत्यू पावण्याचे प्रसंगही गुदरतात श्री स्वामींचे तेव्हाचे सगुण स्वरुपात प्रत्ययास येणारे सामर्थ्य आणि देवत्व याचा बोध येथे होतो परंतु सद्यःस्थितीतही त्यांच्या निर्गुण स्वरुपाच्या कृपेची प्रचिती येते श्री स्वामींच्या बहुतांशी लीलामधून एकवाच्यार्थ म्हणजे शब्दश सरळ अर्थ आणि दुसरा लक्षणार्थ म्हणजे लीलेत दडलेला गर्भित अर्थ असतो सरळ अर्थाने त्यांच्या लीला चमत्कार वाटतात परंतु त्यात दडलेला गर्भित अर्थ कार्यकारण भाव लक्षात घेऊन शोधून त्याचे चिंतन मनन केल्यास तो बोधप्रद ठरतो मुक्या मन्याबाला कुणीही नसताना श्री स्वामी कृपेमुळे वाचा मिळाली जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे याची प्रचिती आली मुकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् याचा साक्षात्कार घडविणारी ही लीला आहे परंतु एवढाच मर्यादित अर्थबोध या लीलेचा नाही या लीलाकथेतील मन्याबा हा मानवाच्या अशाच मुका आणि वेडा या अवस्थेचे प्रतीक आहे त्याला श्री स्वामी सहवासाचा कृपेचा लाभ झाला त्यामुळे त्यात परिवर्तन झाले त्या वेळच्या जनतेच्या आदरास तो पात्र झाला तसा ढोबळ मानाने विचार केला तर आपण सर्व प्रापंचिक माणसे या लीलाकथेतील मन्याबा सारखीच मुकी आणि वेडी आहोत खर्या आणि शाश्वत आनंदाला मुकलेले आणि मृगजळासारख्या भौतिक सुखापाठीमागे उर फाटेपर्यंत धावणारे एक प्रकारचे प्रापंचिक वेडेच आहोत जन्माला येऊनही काय पाहिजे काय मिळवायचे हे न उमजणारे आणि सांगता न येणारे मुकेच आहोत आशादायक बाब म्हणजे सद्यःस्थितीतही श्री स्वामी समर्थांच्या उपासनेने आपणास स्व-स्वरुपाचे भान आणि ज्ञान मिळू शकते आपल्यातील वेडेपण आणि मुकेपण जाऊ शकते आपलापण श्री स्वामी कृपेने मन्याबा होऊ शकतो हा या लीलेतील मार्मिक आणि गर्भित अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या