केजच्या महारुद्रराव देशपांड्यांनी वाडी मुक्कामी सर्व सेवेकर्यांना यथेच्छ भोजन दिले रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले सेवेकरी झोपले होते त्या खोलीतून सामान चोरीला गेले श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने हसू लागले मंडळी जागी होऊन श्री स्वामीस विचारु लागली महाराज का हसता तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन श्रीपाद भटाने श्री स्वामींस विनंती केली की सामान कोठे सापडेल ते सांगा त्यावर श्री स्वामी म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल मग बसलगावचे कुलकर्णी श्री भवानराव देशपांडे यांना सांगितले त्यांनी पाटलाच्या मदतीने मांग रामोशांना धरुन आणले त्यांना मार देताच क्षणी ते कबूल झाले मग किन्हीगावातून ते सर्व सामान घेऊन आले त्यात आश्चर्य असे की श्री स्वामी समर्थांच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यांतून सामान चोरले त्यांना शिक्षा मिळाल्या .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

वाडी मुक्कामी यथेच्छ भोजन मिळाल्यामुळे सर्वच सेवेकरी गाढ झोपी गेले निर्धास्त झाले परमार्थात काय किंवा उपासनेत काय निद्रिस्त / निर्धास्त / बेसावध राहून चालत नाही दररोज आम्हा युध्दाचा प्रसंग या संत तुकारामांच्या उक्तीनुसार सदैव जागृत सिद्ध आणि सज्ज राहावे लागते अन्यथा चोरी होते म्हणजे नुकसान होते हा येथील महत्त्वाचा बोध आहे श्री स्वामी सेवेकर्यांना जागरुकतेची सतत जाणीव करुन देत असताना सेवेकर्यांच्या पोटाची तृप्ती झाली त्यांना गाढ झोप लागली त्यातूनच ते लुटले गेले सोयेगा सो खोयेगा या संत कबीरांच्या उक्तीचा पारमार्थिक बोध येथे होतो श्री स्वामी मात्र हसत होते हसण्याचे कारण त्यांना विचारल्यावर अगदी सहज ते म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन त्यामुळेच साधकाने उपासनेबाबत कधीही बेसावध बेफिकीर गाफील राहू नये आहाराचा अतिरेक त्यातून गाढ निद्रा त्यातून आलस्य जडपणा आणि उदासीनता त्या १५० सेवेकर्यांबाबत हेच घडले कुणी म्हणेल श्री स्वामी असतानाही चोरी का झाली श्री स्वामींना हेच तर सांगावयाचे आहे की उपासनेत सदैव जागरुक सतर्क डोळस राहा सेवेकरी तसे न राहिल्यामुळेच तर श्री स्वामींनी हसून तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन असे उदगार त्या सर्व सेवेकर्यांस उद्देशून काढले परंतु श्री स्वामी समर्थ दयेचे सागर आहेत लुटल्या गेलेल्या त्या सेवेकर्यांनी चोरीबाबत श्री स्वामींना कळवून विचारल्यावर ते म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल याचा अर्थ असा की विवेक आणि बुद्धी यांची मदत घ्यावी चोरी झाली म्हणून हात बांधून गप्प बसणे योग्य नव्हे चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते येथे भवानराव म्हणजे विवेक आणि गावचा पाटील म्हणजे बुद्धी ही दोघेही श्री स्वामींचीच पोरे त्यांच्याच मदतीने म्हणजे विवेक आणि बुद्धीच्या साहाय्याने कार्य करावे हा बोधही होतो .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या