सातारा जिल्ह्यातील नानाबुवा तांदुळवाडकर म्हणून पंढरीचे वारकरी होते एकदा ते श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आले श्री स्वामींचे अदभूत दिव्य तेज व आजानुबाहू मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्र् गळू लागले श्री स्वामी समर्थांपुढे भजन करावे असे त्यांच्या मनात आले तोच श्री स्वामी अकस्मात ते जेथे होते त्या बिर्हाडी आले नानाबुवास आनंद झाला त्यांनी भजनास सुरुवात केली सर्व श्रोतेजन प्रेमरसात बुडून गेले नानाबुवा एक घटका निश्चेष्ट पडले ते सावध झाल्यावर पुन्हा भजन करु लागले भजनाची समाधी केली नंतर त्यांना गणपतराव जोशी यांनी विचारले आपण एक घटका तर तटस्थ (निश्चेष्ट) का होता ते कृपा करुन सांगावे त्यावर नानाबुवा म्हणाले निम्मे भजन झाल्यावर श्री स्वामी समर्थांनी आपले हे स्वरुप अदृष्य करुन त्या जागी सावळी मूर्ती पीतांबर परिधान केलेली कटीवर दोन्ही हात ठेवलेली मस्तकी मुकुट कानी कुंडले मनमोहक रुप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन मला समाधी लागली माझे देहभान हरपले पुढे काही वेळाने देहावर वृत्ती आली तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत भक्तजनांचे उध्दारार्थ हा मानवी देह धारण करुन आम्हा मूढ जनांचे ते तारण करीत आहेत यात संदेह नाही .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील नानाबुवा तांदुळवाडकर हे पंढरीचे वारकरी आणि श्रेष्ठतम विठ्ठलभक्त होते त्यांनी श्री स्वामी समर्थांची दैवी थोरवी ऐकली होती म्हणून त्यांच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला आले श्री स्वामी दर्शनाचे त्यांच्या मनावर प्रचंड गारुड झाले ते अंतर्बाह्य थरारुन गेले रोमांचित झाले प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंगच भेटला अशी नानाबुवांची श्री स्वामी दर्शनाच्या वेळी भावअवस्था झाली श्री स्वामींपुढे भजन करावे असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले पण श्री स्वामी भजनास येतील का आलेच तर बसतील का बासलेच तर ते भजन ऐकतील का अशा प्रश्नांचे काहूर त्यांच्या मनात निर्माण झाले हे सर्व अंतःसाक्षी श्री स्वामींना समजले ते तात्काळ गणपतराव जोशांच्या बिर्हाडी असलेल्या नानाबुवांकडे आले श्री स्वामींस पाहून नाना सदगदित झाले त्यांनी भजनास सुरुवात केली थोड्याच वेळात नानाबुवास भाव समाधी लागली त्या अवस्थेत श्री स्वामींनी बुवास पांडुरंगाच्या स्वरुपात दर्शन दिल्याचा सविस्तर उल्लेख वर लीलेत आला आहे नानाबुवा तांदुळवाडकरांना आलेला तेव्हाचा अनुभव म्हणजे मानवरुपी काया दिससी आम्हास अक्कलकोटी केला यतिवेष वास पूर्णब्रम्ह तुम्ही अवतरला खास असाच होत होता .

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या